“राज ठाकरे मराठ्यांविरोधात कधी बोलायला लागले?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jaranage Patil | अंतरवाली सराटीहून मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी दीड कोटी बांधवांना सोबत घेत मुंबईकडे कूच केली होती. मात्र त्यांना वाशी येथे थांबवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत आध्यादेश काढला. यानंतर मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांबाबत जातप्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली नाहीतर पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा केला. यावर आता राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. यावर मनोज जरांगेंनी पुन्हा पलटवार केला.

मराठा समाजाच्या आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंवर टीका केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव साजरा केला आणि आता उपोषण पुन्हा उपोषण का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“राज ठाकरे यांना काय माहित आम्ही काय मिळवलं आहे. आम्ही मिळवल्याशिवाय मागे हटणार आहे का? असा सवाल आता उपस्थित केला आहे. 2000 आणि 2001 मधील कायदा ओबीसीसाठी आहे. त्या कायद्यामध्ये दुरूस्ती करायची असेल तर अधिसूचना करावी लागते”, असं प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिलं आहे.

“राज ठाकरे मराठ्यांविरोधात कधी बोलायला लागले?”

“राज ठाकरे आधी मराठा समाजाच्या बाजूने बोलत होते, मात्र ते आता आमच्याविरोधात कधीपासून बोलायला लागले. ते नाशिकला जाऊन आले का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. कायदा राज ठाकरेंना सांगावा म्हणजे अवघड आहे. 2000 आणि 2001 ओबीसी कायदा आरक्षणासाठीचा आहे. 15 दिवस आधी अधिसूचना काढावी लागते आणि त्यानंतर कायदा पारीत करावा लागतो”, असं मनोज जरांगे पाटील यांनी लिखीत नियम सांगितला आहे.

“तुम्ही कोणाची सुपारी घेता का?”

“राज ठाकरे आमच्या बाबतीत बोलत असतील तर हे आम्हाला पटत नाही. तुम्हाला उलटसुलट बोलायचं असेल तर तुम्ही तुमचं बघा. तुम्ही कोणाची सुपारी घेता का ते बघा”, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“मुख्यमंत्री त्या दिवशी तिथं गेले, त्यावेळी विजयोत्सव साजरा करण्यात आला. कोणता विजय मिळाला?”, मराठा बांधव मोर्चाला गेले त्यांना कळालं का काय झालं? विजय झाला मग उपोषणाला कशाला बसता?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

News Titles – manoj jarange patil reply to raj thackeray about maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; मोठी अपडेट समोर

“एक ओळख असावी यासाठी मी कॉन्ट्रोव्हर्सी केली…”पूनम पांडेच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ