गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदाराकडून मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad Firing | राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कधी पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार होतो, तर कधी सत्ताधारी नेते एकमेकांचा सूड उगवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशीच एक घटना आता उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये घडली आहे. भाजप नेते गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

गायकवाड विरूद्ध गायकवाड

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे दोघेही सत्ताधारी पक्षातील नेते आहेत. एका जून्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

महेश गायकवाड यांच्यावर शस्रक्रिया

महेश गायकवाड यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन गोळ्या काढण्यात आल्या आहेत. महेश गायकवाडांसोबतच इतरही काही साथीदार होते त्यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला. ते थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यासोबत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत.

तिघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणामध्ये गणपत गायकवाडांसह इतरांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जामिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या करण्याचा उद्देश गणपत गायकवाडांचा होता अशी माहिती समोर आली आहे. यावर आता गणपत गायकवाड यांनी हत्येमागचं कारण सांगितलं आहे.

गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing) यांनीच सांगितलं कारण

गणपत गायकवाड यांनीच हत्येचा जबाब दिला आहे. एका जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे. गणपत गायकवाड म्हणाले की,  “मी 10 वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. त्यावर महेश गायकवाड जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता, संध्याकाळी महेश गायकवाड 400 ते 500 जण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आला. माझा मुलगा बाहेर जात असताना त्याला धक्काबुक्की केल्यानं हा प्रकार मला सहन न  झाल्यानं त्याच्यावर गोळीबार केला.” असं गणपत गायकवाड यांनी जबाब दिला.

स्थानिक पातळीवरील मतभेद उघड

दोन्ही नेते सत्ताधारी पक्षातील होते. आपल्या जुन्या वादातून भाजप आमदारानं शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखाविरोधात कायदा व सुव्यवस्था हाती घेतला. यातून एवढंच निष्पन्न झालं आहे की या दोन्ही पक्षामध्ये स्थानिक पातळीवरील मतभेद उघड समोर आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; मोठी अपडेट समो