“एक ओळख असावी यासाठी मी कॉन्ट्रोव्हर्सी केली…”पूनम पांडेच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडेचं (Poonam Pandey) आज (2 फेब्रुवारी) निधन झालं आहे. तिच्या अचानक जाण्याने  सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलीवुडमधील कलाकार सह चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. पुनम कायमच वादात राहायची. कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी इतर कारणांनी ती सतत चर्चेत असायची. याबाबत पुनमने स्वतः मोठी कबुली दिली होती.

2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पुनमने याबाबत कबुली दिली होती. आपली चर्चा व्हावी म्हणून, कायमच मी कॉन्ट्रोव्हर्सी करत असल्याचे यावेळी तिने सांगितलं होतं. तिची ही मुलाखतही आता व्हायरल होत आहे.

पुनमने केला मोठा खुलासा

एका मुलाखतीमध्ये पुनम (Poonam Pandey) म्हणाली होती की, “इंडस्ट्रीमध्ये खूप मुलींनी खान आणि कपूर सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. पण त्यांना अजून कुणी ओळखत नाही. त्यामुळे स्वतःला ओळखावे, आपलीही एक ओळख असावी यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तुमच्या पाठीमागे कुणी नसते, म्हणजेच तुमचा कुणीही गॉडफादर नसतो तेव्हा कॉन्ट्रोव्हर्सीची मदत घ्यावी लागते.”, असे पुनम म्हणाली होती.

“मला काम मिळण्यासाठी मी कॉन्ट्रोव्हर्सी केली. मला कामाची अत्यंत गरज होती. म्हणून मला कुणी काही सांगितले तर मी त्यावर डोळे झाकून विश्वास करायचे. कोणीही मला म्हटलं की एखादी गोष्ट कर किंवा ते केल्याने तुझ्या करिअरला फायदा होईल, तर ते मी विचार न करता लगेच ती गोष्ट करायची.”, असंही पुनम म्हणाली होती.

पुनम अनेक वादात सापडली आहे. मागे ती एका पॉर्नोग्राफी रॅकेटमध्येही सापडली होती. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राही त्यात भागीदार होता. अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये पुनमने अनेक खुलासे केले होते. यामध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बोलून दाखवले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

पुनमने घेतला जगाचा निरोप

पुनम पांडेच्या (Poonam Pandey) इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. “आजची सकाळ आमच्यासाठी अत्यंत कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम गमावली आहे. यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रेमाने भेटली. या दुःखाच्या वेळी, आम्ही तुम्हाला गोपनीयतेची विनंती करत आहोत. आम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीतून तिची आठवण आंच्यासोबत कायम राहील.”, अशी पोस्ट पुनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर करण्यात आली आहे.

News Title- Poonam Pandey big revelation

 महत्त्वाच्या बातम्या –

बजेटनंतर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

मृत्यूनंतर पुनम पांडेच्या वैवाहिक आयुष्याबाबत झाला सर्वात मोठा खुलासा!

पूनम पांडेला नेमका कोणता आजार झाला होता?, मोठी माहिती आली समोर

‘…त्या दोघांपासून जीवाला धोका’; स्वाती मोहोळचा खळबळजनक दावा

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर