भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न जाहीर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न पुरस्कारची घोषणा करताना म्हटलं आहे की, मला कळवायला अतिशय आनंद होत आहे. लालकृष्ण अडवाणीजी (Lal Krishna Advani) यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मी त्यांच्याशीही बोललो आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Lal Krishna Advani | नरेंद्र मोदींनी केली घोषणा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि 1974 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणिबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

भाजप सरकार आल्यावर आडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात 1999-2004 या काळात ते उपपंतप्रधान होते. राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

2002 ते 2004 या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यामध्ये सख्य नसल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर अडवाणींना पुरस्कार जाहीर करून नरेंद्र मोदी हे अडवाणींना विसरले नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

आमदाराच्या गोळीबारानं वातावरण तापलं; प्रशासनाने घेतला सर्वांत मोठा निर्णय

‘तू गप्प बस, नाहीतर टपकन…’; जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

अभिनेत्री पूनम पांडे निघाली जिवंत, सोशल मीडीयावर व्हिडीओ तूफान व्हायरल

मोठी बातमी! पूनम पांडे जिवंत आहे, स्वत: समोर येत केला मोठा खुलासा

“तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडात…”, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा