शरद मोहोळच्या हत्येनंतर मारेकऱ्याचं देवदर्शन, ‘या’ राज्यातील मंदिरांमध्ये केला अभिषेक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Mohol | शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणामध्ये 15 हून अधिक आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या हत्येचा मास्टरमाईंड विठ्ठल शेलार हा नवी मुंबईमध्ये लपून बसला होता. पनवेल आणि वाशी पोलिसांनी त्याला 15 जानेवारी रोजी ताब्यात घेतलं. त्यानंतर मास्टरमाईंड गणेश मारणेला देखील पुणे-नाशिक रोडवर बुधवारी पकडलं. यावेळी त्यानं पाच राज्यामध्ये देवदर्शन केलं असल्याची माहिती समोर येत आहे.

गणेश मारणेचं ‘या’ राज्यात देवदर्शन

गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य आरोपी असल्याचं उघडकीस आलं आहे. यामुळे गेली अनेक दिवसांपासून या दोघांच्या मागावर पोलिस होते. याकाळामध्ये गणेश मारणे हा गुजरात, महाराष्ट्र, केरळ, हैद्राबाद, बंगळूर या पाच राज्यांमध्ये होता. त्यानं या पाच राज्यातील मंदिरांमध्ये जात देवदर्शन केलं आणि देवाचा अभिषेक केला.

मंदिरांमध्ये देवाला अभिषेक

त्यानं राज्यातील तुळजापूर, निपाणी, वाई येथे देवदर्शन केलं. तसेच तुळजापूरमध्ये देवाचा अभिषेक  केला. इतर राज्यांमध्ये त्यांनं रेल्वेनं देखील प्रवास केला असल्याची माहिती आता समोर येत आहे. केरळहून तो पुण्याला येत होता, मात्र तो नाशिकला आला. त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं त्यांनं पुण्याकडं येण्याचं नियोजन केलं. यावेळी त्यानं ओला गाडी केली, मात्र नंतर ती गाडी त्यानं रद्द केली. यावेळी तो खासगी वाहनाने पुण्याकडे जात होता. त्याठिकाणाहून त्याला आपल्या वकिलाची लोणावळ्याला भेट घ्यायची होती. मात्र गणेश मारणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलिसांनी पुणे नाशिक रोडवर अनेक खासगी गाड्यांचा तपास करायला सुरूवात केली आणि त्याचवेळी गणेश मारणेला पोलिसांनी बुधवारी तपासादरम्यान एका खासगी वाहनातून ताब्यात घेतलं असून जेरबंद केलं. अशातच आता शरद मोहोळच्या हत्येप्रकरणाबाबत (Sharad Mohol) आणखी नवं नवीन खुलासे बाहेर येत आहेत.

शरद मोहोळ प्रकरणाला अनेक धागेदोरे

गणेश मारणेच्या वाहनचालकाचा आणि शरद मोहोळचा वाद झाला होता. त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर शरद मोहोळची हत्या करण्यात झाली. मात्र हेच एक कारण नसून याप्रकरणाला अनेक धागेदोरे आहेत. शरद मोहोळला नामदेव कानगुडेनं एका निवडणुकीसाठी मदत मागितली होती यावर शरद मोहोळनं कोणतीही मदत केली नाही. यावेळी विठ्ठल शेलारनं कानगुडेला मदत केली, तसेच शरद मोहोळचा आणि विठ्ठल शेलारचा काही वर्षांपासून टेंडरवरून वाद असल्याची माहिती समोर आली असून अशा अनेक वादातून शरद मोहोळचा खून करण्यात आला आहे.

शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळचा धक्कादायक जबाब

दरम्यान याप्रकरणानं अनेक वळणं घेतली आहेत. शरद मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळनं धक्कादायक दावा केला आहे. विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं जबाबामध्ये म्हटलं आहे.

News Titles – sharad mohol case in new update about ganesh marne

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; मोठी अपडेट समोर

“एक ओळख असावी यासाठी मी कॉन्ट्रोव्हर्सी केली…”पूनम पांडेच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ