भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahesh Gaikwad | भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing) यांनी काल (2 फेब्रुवारी) थेट पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या (Mahesh Gaikwad) नेत्यावर गोळीबार केल्याने मोठी खळबळ माजली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

कल्याण डोंबिवली शहरात ही घटना घडली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात महेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आता डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर आली आहे.

महेश गायकवाड यांना सहा गोळ्या झाडल्या

महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाचे अपडेट डॉक्टरांनी दिले आहेत. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावरही गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. राहुल पाटील यांनाही दोन गोळ्या लागल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले आहे. गोळ्या काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

उल्हासनगरमधल्या या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

विरोधी पक्षाकडून भाजप-शिंदे गटावर टीका

जखमी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांची शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. मात्र, या घटनेमुळे विरोधी पक्षाकडून आता भाजपसह शिंदे गटाला टार्गेट केले जात आहे. भाजपाचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा धाब्यावर बसवून आपण हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वास या पदाधिकाऱ्यांना आलेला आहे, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

News Title- Mahesh Gaikwad health update

महत्त्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; मोठी अपडेट समोर