Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे. यानंतर त्याला सतत टार्गेट केले जात आहे.
घटस्फोटानंतर नुकतीच सानिया मिर्झाने एक पोस्ट केली आहे. यावर चाहत्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत शोएबला टार्गेट केले आहे. नेटकऱ्यांनी शोएब याच्यावर संताप व्यक्त केला आहे. शोएबमुळे सानियाचं आयुष्य खराब झाल्याचं काहींनी म्हटलं आहे.
सानिया मिर्झाची पोस्ट
सानिया मिर्झा (Sania Mirza) आपल्या मुलांसोबत सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. आपल्या मुलांसोबत ती निवांत बसलेली यात दिसत आहे. याअ फोटोला तिने कॅप्शनमध्ये ‘लाईफलाईन’ असे लिहिले आहे. नेटकरी सानियाच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. यासोबतच शोएबला टार्गेटही करत आहेत.
‘सानिया तू काळजी करु नकोस, संपूर्ण राष्ट्र तुझ्यासोबत आहे.’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘एकामुळे तुझं आयुष्य खराब झालंय.’, अशा प्रतिक्रिया सानियाच्या पोस्टवर उमटत आहेत. सोशल मिडियावरील युजर आता थेट शोएबला टार्गेट करत आहेत. ‘शोएब मलिक हेट बटन…’, असे एका युजरने म्हटले आहे. तर, दुसऱ्या एकाने ‘सानियासाठी रिस्पेक्ट बटन…’ अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सानियाने दिला घटस्फोट
2022 पासून शोएब मलिकच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. त्याने सानियाला (Sania Mirza) धोक देत एका मॉडेलशी नाते संबंध ठेवले. म्हणूनच सानियाने शोएबला घटस्फोट दिला. नंतर शोएबने सना जावेद या प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं. सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली.
एका शूटदरम्यान शोएब आणि सनाची भेट झाली होती. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे सना आणि शोएब अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी या वर्षी लग्नाचा निर्णय घेत आपला संसार थाटला. मात्र यावरून अजूनही शोएबवर भारतासह पाकिस्तानमधूनही टीका होत आहे.
News Title- Sania Mirza emotional post
महत्वाच्या बातम्या-
भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?
नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती
एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!
महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…