आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न केले जात आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावरही आता सवाल केले जात आहेत.

विरोधी पक्षाकडून आता फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर संताप व्यक्त करत याला फडणवीसच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच मोठी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा

या संपूर्ण प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून याचा पुढील तपास केला जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणपत गायकवाड सह इतर आरोपींना आता ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing case) यांचे घर आणि कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, गोळीबार करण्यात आलेले महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यानंतर प्रशासनाने दंगल नियंत्रक पथकही तैनात केले आहे.

विरोधी पक्षाकडून या प्रकरणी प्रचंड टीका केली जात आहे. प्रतिक्रिया देताना आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळेही एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे.

“मुख्यमंत्री शिंदे यांनी माझे कोट्यवधी रुपये..”

गणपत गायकवाड एवढयावरच न थांबता त्यांनी पुढे अनेक आरोप केले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. ते देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं किती पैसे खाल्ले आहेत, किती बाकी आहेत. कोर्ट निर्णय देईल तो मला मान्य आहे. पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे.”, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

News Title- Devendra Fadnavis big announcement in firing case

महत्वाच्या बातम्या-

आमदाराच्या गोळीबारानं वातावरण तापलं; प्रशासनाने घेतला सर्वांत मोठा निर्णय

‘तू गप्प बस, नाहीतर टपकन…’; जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

अभिनेत्री पूनम पांडे निघाली जिवंत, सोशल मीडीयावर व्हिडीओ तूफान व्हायरल

मोठी बातमी! पूनम पांडे जिवंत आहे, स्वत: समोर येत केला मोठा खुलासा

“तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडात…”, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा