“राज्यात गुंडराज सुरू, उद्या मलाही गोळ्या झाडतील…”

Supriya Sule | उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात थेट आमदाराने केलेल्या गोळीबाराने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यासोबतच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. या प्रकरणी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. 

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हे सर्व घडत आहे, मग गृहमंत्री काय करतायेत?, मुख्यमंत्र्यांनी आता लवकर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांच्या आपापसातली जी काही भांडणे असतील ती त्यांनी सोडवावीत. यामध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस भरडला जातोय. असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

तसेच, राज्याच्या गृहमंत्र्यांचे यावर काहीही नियंत्रण उरले नसून यामुळे राज्यात मोठी गुन्हेगारी वाढती आहे. आता मी याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकणार आहे, असेही सुळे म्हणाल्या आहेत. बंदूक सीमेवर जवानांकडे आणि पोलिसांकडे असायला हवी, मात्र इथे तर अंधाधुंद गोळीबार केला जातोय. देशातील सर्वात उत्कृष्ट पोलीस दल कुठले असेल तर ते महाराष्ट्रातले आहे आणि महाराष्ट्राच्याच एका पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदार गोळीबार करत असेल तर ही राज्यासाठी अत्यंत शरमेची गोष्ट असल्याचंही सुळे यांनी म्हटलंय.

कॅमेऱ्यासमोर पोलीस ठाण्यात गोळीबार केला जात आहे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची सगळी जबाबदारी घेऊन तातडीने आपला राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी केली आहे. या प्रकरणी आता विरोधी पक्षाकडून भाजप तसेच शिंदे गटाला टार्गेट करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी अशी घटना कधीच घडली नाहीये. मागच्या वर्षीही असाच गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील व्यक्तींना क्लिन चिट देण्याचं पाप या सरकारने केलंय. आता तर पोलिस चौकीतच गोळीबार होतोय, म्हणजे हा गँगवार आहे. उद्या हे लोक तुम्हाला किंवा मलाही गोळ्या झाडतील, राज्याच्या गृहमंत्र्यांचं हे अपयश असून महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला आहे. त्यात महेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर तातडीने त्यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एका जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे सरकारवर टीका होत आहे. याबाबतच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे.

News Title-  Supriya Sule demand Devendra Fadnavis resignation

महत्वाच्या बातम्या-

गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदाराकडून मोठा खुलासा!

“राज ठाकरे मराठ्यांविरोधात कधी बोलायला लागले?”

भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!