‘ही’ लक्षणे ठरू शकतात हृदयासाठी धोक्याची घंटा; आताच व्हा सावध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 Heart Attack | फास्ट फूड, अनियमित झोप, जेवणातील बदल तसेच बदलती जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यातच आता हार्ट अटॅक ( Heart Attack Symptoms) तर साधारणच झाला आहे. अगदी विशीतील तरुणांना याची समस्या उद्भवते आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

बदलत्या जीवनशैलीसोबत आहाराकडे दुर्लक्ष देऊन बिलकुल चालत नाही. आपल्या आहारात सर्व जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर आपल्याला संकेत देत असते. त्याकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवे, अन्यथा ही चूक अतिशय महागात पडू शकते.

‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

पायांची सूज- तुमच्या पायांना जर अचानक सूज येत असेल तर, याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, ही लक्षण आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे त्वरित याचा उपचार घ्यायला हवा.

श्वास घेण्यास त्रास- तुम्हाला श्वासोच्छवासाची (Heart Attack Symptoms ) लक्षणे दिसत असतील तर, त्वरित सावध व्हा

. कारण, हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. चालताना किंवा अगदी बोलताना जर तुमचा श्वास वर जात असेल तर त्यावर तातडीने पाऊल उचलने आवश्यक असते.

वारंवार चक्कर येणे- अशा रुग्णांना खूप अशक्तपणा येतो. त्यामुळे त्यांना वारंवार चक्कर येत असते. हार्ट अटॅक येण्याच्या काही मिनिटे किंवा महिने आधी ही समस्या दिसून येते. हे संकेत शरीरासाठी अतिशय धोक्याचे असतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

कानाशी सबंधित समस्या निर्माण होणे- यामुळे तुम्हाला अचानकच कान खूपच जड वाटायला लागतो. किंवा कधी कधी ऐकण्यासही काही समस्या येऊ शकतात. ही लक्षणे हार्ट अटॅक संबंधित असू शकतात. शरीर आपल्याला अगोदरच ही संकेत देत असते. याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल- हृदयविकाराचा झटका (Heart Attack Symptoms ) वेगवेगळ्या प्रकारचा असण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल जाणवत असतो. असे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासणी करणे आवश्यक असते. या छोट्या छोट्या गोष्टीही तुम्हाला महागात पडू शकतात.

हाताला मुंग्या येणे-  तुमच्या डाव्या हाताला सतत मुंग्या येणे, किंवा हात कधी कधी सुन्न पडणे, अशा समस्या उद्भवू शकतात. असे काही दिसून आल्यास त्वरित सावध होऊन उपचार घेणे गरजेचे असते. याकडे लवकर लक्ष दिले तर, तुम्ही हार्ट अटॅक येण्यापासून वाचू शकता.

News Title- Heart Attack Symptoms

महत्वाच्या बातम्या-

आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!

“एकामुळे आयुष्य खराब झालंय…”, सानिया मिर्झाच्या पोस्टची चर्चा

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर!

शरद मोहोळच्या हत्येनंतर मारेकऱ्याचं देवदर्शन, ‘या’ राज्यातील मंदिरांमध्ये केला अभिषेक

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न जाहीर!