“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad firing | राज्यामध्ये काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांनी महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला. यावरून आता राज्यातील विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या असून अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सुप्रिया सुळे यांना  प्रत्युत्तर दिलं आहे.

गणपत गायकवाड प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे संतप्त झाल्या आहेत. हे प्रकरण मी लोकसभेमध्ये मांडणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना मी भेटून याप्रकरणामध्ये लक्ष घालण्यास सांगणार आहे. भाजपकडे कोणतीही नैतिकता राहिली नाही. ही कोणत्या सत्तेची मस्ती आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,

अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. यावर आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गणपत गायकवाड प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया 

सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची मागणी केली. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. “फडणवीस काय गोळ्या मारायला सांगतात का? ही वैयक्तिक भांडणं आहेत. याला फडणवीस काय करतील? यामध्ये नेमका त्यांचा संबंध काय मला देखील जीवे मारण्याची धमकी येते, यावर केवळ ते कायदेशीर कारवाई करतील”, असं म्हणत छगन भुजबळ यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलं आहे.

“एकाच बाजूनं भाष्य करणं बरोबर नाही” 

“पोलीस ठाण्यात गोळीबार झाला असून याचं मला आश्चर्य वाटत आहे. याचं नेमकं कारण काय? ज्यांना गोळ्या लागल्या आहेत त्यांचे प्राण वाचवाले पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांच्यावर गोळीबार झाला असता त्यांनी प्रतिकार म्हणून गोळीबार केला होता का? त्यांच्यावर याआधी गोळीबार करण्यात आला होता का? अशा दोन्ही बाजूनं पडताळणी करावी”, असं ते म्हणाले, त्यानंतर त्यांनी अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणावेळी घडलेल्या घटनेचा संदर्भ देत मिश्किल टिप्पणी केली.

अंतरवाली सराटीचा संदर्भ देत काय म्हणाले भुजबळ?

यावेळी बोलताना त्यांनी अंतरवाली सराटी येथील संदर्भ दिला आहे. ते म्हणाले की, “अंतरवाली सराटी येथे अनेक पोलिसांवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, मात्र यामध्ये केवळ पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बाजू मांडण्यात आली,”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

काय होतं प्रकरण?

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथे एका पोलीस ठाण्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे. गणपत गायकवाडच्या एका जागेवर महेश गायकवाड ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच गणपत गायकवाडच्या मुलाला पोलीस ठाण्यातच धक्काबुक्की झाल्यानं थेट महेश गायकवाड आणि त्यांच्या शाथीदारांवर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. यातील दोन गोळ्या या महेश गायकवाडला लागल्या असून ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

News Title – ganpat gaikwad firing new update

महत्त्वाच्या बातम्या