Virat Kohli आणि अनुष्का लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार; माजी खेळाडूचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. काहींनी विराट कोहलीच्या आईची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले, तर अनेकांनी पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असल्याची माहिती दिली. मात्र, आता विराटने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने न खेळण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा झाला आहे.

किंग कोहलीचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सने याबाबत माहिती दिली आहे. विराटचा खास मित्र एबी डिव्हिलियर्सने हे गुपित उघड केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार आहे, त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यापूर्वी सोशल मीडियावर अफवा पसरली होती की विराटच्या आईची तब्येत खराब आहे आणि त्यामुळे त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

माजी खेळाडूचा मोठा खुलासा

मात्र, विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली याने अलीकडेच त्याची आई सरोज कोहली आजारी नसल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून या वृत्ताचे खंडन केले होते. विकासने माध्यमांना अशा खोट्या बातम्या पसरवू नयेत अशी विनंती केली होती. अशातच डिव्हिलियर्सने एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे किंग कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसते.

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीसाठी एकत्र खेळले आहेत. आता डिव्हिलियर्सने विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा पुन्हा एकदा पालक होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याआधी मागील वर्षीही विराट दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडून काही दिवसांसाठी भारतात परतला होता.

Virat Kohli दुसऱ्यांदा बाबा होणार – डिव्हिलियर्स

तेव्हा देखील डिव्हिलियर्स म्हणाला होता की, होय, विराट दुसऱ्या मुलाच्या आगमनाची तयारी करत आहे आणि याच कारणामुळे विराट आपला सर्व वेळ कुटुंबाला देत आहे. सध्या भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. विराटने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.

एबी डिव्हिलियर्सने असेही सांगितले की, विराट तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात सामील होईल की नाही याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. मात्र, याआधी विराट तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. विराट आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लग्न केले. या दोघांना वामिका नावाची तीन वर्षांची मुलगी आहे.

News Title- Virat Kohli and Anushka will soon become parents for the second time, reveals former South African player AB de Villiers
महत्त्वाच्या बातम्या –

“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

‘ही’ लक्षणे ठरू शकतात हृदयासाठी धोक्याची घंटा; आताच व्हा सावध

अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…

“राज्यात गुंडराज सुरू, उद्या मलाही गोळ्या झाडतील…”

आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!