गोळीबार प्रकरण: शिवसेना नेत्याची 6 तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया; 6 गोळ्या काढल्या, Shrikant Shinde भावूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shrikant Shinde | शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली. दोन प्रमुख राजकीय पक्षांचे नेते पोलीस स्टेशनमध्ये भिडले अन् एकच राडा झाला. याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनीच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश यांना ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रूग्णालयाने काढलेल्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले. शनिवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड हे कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आहेत.

शुक्रवारी रात्री गोळीबार

श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघातील असलेले गायकवाड हे मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचे निकटवर्तीय मानले जातात. श्रीकांत शिंदे महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले असता ते भावूक झाल्याचे दिसले. रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांचे डोळे पानावले. तसेच राज्य सरकारकडून याप्रकरणी सखोल चौकशीची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शनिवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार शिंदे यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांकडून त्यांनी दोघांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी माध्यमांशी न बोलण्यास प्राधान्य दिले अन् ते गाडीत जाऊन बसले. मात्र काही क्षणात गाडीतून उतरून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Shrikant Shinde भावूक

महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. यावेळी ते गंभीर अवस्थेत दिसले. आपला सहकारी मृत्यूशी झंज देत असल्याचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. श्रीकांत शिंदे यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. गोळीबाराच्या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली तसेच राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी रात्री हिल लाइन्स पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारप्रकरणी उल्हासनगर न्यायालयाने शनिवारी भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत काळू गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 56 वर्षीय गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. जखमींना शुक्रवारी रात्रीच ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

News Title- After BJP MLA Ganpat Gaikwad fired at Shiv Sena officials Mahesh Gaikwad and Rahul Patil, MP Shrikant Shinde visited Jupiter Hospital in Thane and met the injured
महत्त्वाच्या बातम्या –

Virat Kohli आणि अनुष्का लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार; माजी खेळाडूचा मोठा खुलासा

“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

‘ही’ लक्षणे ठरू शकतात हृदयासाठी धोक्याची घंटा; आताच व्हा सावध

अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…

“राज्यात गुंडराज सुरू, उद्या मलाही गोळ्या झाडतील