Poonam Pandey | मृत्यूची खोटी बातमी पसरवणं भोवलं; पोलिसांत तक्रार, मॅनेजरसोबत रचला होता कट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey | प्रसिद्धीसाठी कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही… याचे ताजे उदाहरण म्हणजे पूनम पांडे. पूनम पांडेने तिच्या निधनाची खोटी बातमी पसरवल्यामुळे सिनेजगतातील अनेक स्टार्स तिच्यावर नाराज आहेत. चाहत्यांसह विविध क्षेत्रातील नामांकितांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. अभिनेत्रीच्या या पब्लिसिटी स्टंटमुळे संतप्त झालेल्या ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ने तिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पूनम पांडेच्या कृत्याबद्दल असोसिएशनने मुंबईच्या विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’चे पत्र सोशल मीडियावर चर्चेत आहे. पूनम पांडेने प्रसिद्धीसाठी हे नाटक केले असल्याचा दावा अनेकांनी केला. आता तिच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

मॅनेजरसोबत रचला होता कट

‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ने आपल्या पत्रात लिहिले आहे की, मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याच्या खोट्या बातमीने भारतीय फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. पूनम पांडेने पब्लिसिटी स्टंटसाठी ही खोटी बातमी पसरवली होती. या फेक न्यूजने श्रद्धांजली वाहणाऱ्या सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या.

पूनम पांडेविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती करणाऱ्या पत्रात असोसिएशनने पुढे आणखी लिहले की, प्रसिद्धीसाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती आहे. अशा खोट्या बातम्या पसरवण्याचे धाडस कोणी करू नये, यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची स्वस्त प्रसिद्धी मिळवणे चित्रपटसृष्टीला मान्य नाही.

 

Poonam Pandey च्या अडचणी वाढल्या

मागील दोन दिवसांपासून पूनम पांडे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे कळताच नेटकऱ्यांनी भावूक होत तिला श्रद्धांजली वाहिली. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सर्वकाही नाटक असल्याचे उघड झाले. खुद्द पूनमने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

दरम्यान, पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी हा पब्लिसिटी स्टंट ठरला. व्हिडीओ शेअर करून अभिनेत्रीने तिच्या लाजिरवाण्या कृतीबद्दल भाष्य केले. कर्करोगाविरूद्ध जनजागृती मोहीम म्हणून मी केले आहे, असे तिने सांगताच अनेक सेलिब्रिटी तिच्यावर टीका करत आहेत. आता ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

News Title- All Indian Cine Workers Association has filed a complaint at Vikhroli Police Station against actress Poonam Pandey for spreading fake news about her death
महत्त्वाच्या बातम्या –

गोळीबार प्रकरण: शिवसेना नेत्याची 6 तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया; 6 गोळ्या काढल्या, Shrikant Shinde भावूक

Virat Kohli आणि अनुष्का लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार; माजी खेळाडूचा मोठा खुलासा

“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

‘ही’ लक्षणे ठरू शकतात हृदयासाठी धोक्याची घंटा; आताच व्हा सावध

अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…