Share Market This Week l अर्थसंकल्पानंतर बाजार नवा उच्चांक गाठणार? होल्डर्सचे लक्ष असणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Share Market This Week l 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला आहे. गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळाला आहे. मात्र त्यानंतर अर्थसंकल्पोत्तर सत्रात चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत शेअर बाजारासाठी 2024 मध्ये आतापर्यंतचा सर्वोत्तम आठवडा ठरला आहे.

Share Market This Week l वर्षातील सर्वोत्तम आठवडा :

नवीन वर्षाच्या सुरवातीला शेअर बाजाराने उच्चांक गाठला आहे. मात्र 2 फेब्रुवारी (शुक्रवार), गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी BSE सेन्सेक्स 440.34 अंकांच्या किंवा 0.61 टक्क्यांच्या वाढीसह 72,085.63 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे NSE चा निफ्टी 156.35 अंकांच्या किंवा 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 21,853.80 अंकांवर होता. संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स 1,384.96 अंकांनी (1.95 टक्के) आणि निफ्टी 501.2 अंकांनी (2.34 टक्के) वाढला आहे.

बजेटच्या दिवशी बाजार घसरला (Share Market This Week) :

अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात चांगली कामगिरी झाली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना देशांतर्गत शेअर बाजार मर्यादेत फिरत होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 106.81 अंकांनी तर निफ्टी 28.25 अंकांनी घसरला असल्याचे पाहायला मिळाला आहे.

Share Market This Week l सलग 2 आठवड्यांच्या घसरणीवर ब्रेक :

गेल्या आठवड्यात सलग दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर शेअर बाजार रिकव्हर झाला आहे. त्याआधी 25 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 982.56 अंकांनी किंवा 1.37 टक्क्यांनी घसरला होता, तर निफ्टी 269.8 अंकांनी किंवा 1.24 टक्क्यांनी घसरला होता. त्याआधी 20 जानेवारीला संपलेल्या (Share Market) आठवड्यात सेन्सेक्स 1,144.8 अंकांनी किंवा 1.57 टक्क्यांनी घसरला होता तर निफ्टी 323 अंकांनी घसरला होता.

त्यामुळे उद्या म्हणजेच सोमवारी 5 फेब्रुवारीला शेअर बाजाराची सुरवात कशी होणार आणि या आठवड्यात बाजारात काय बदल घडणार याकडे सर्व होल्डर्सचे लक्ष असणार आहे. (Share Market)

News Title : Share Market This Week l

महत्त्वाच्या बातम्या – 

“मला हाकलवून लावायची गरज नाही मी आधीच राजीनामा…” छगन भुजबळांचा धक्कादायक दावा

गणपत गायकवाड अखेर ‘या’ तारखेपर्यंत गजाआड, काय घडलं कोर्टात?

NZ vs SA, Rachin Ravindra l CSK चा स्टार खेळाडू रचिन रवींद्र जोमात; कसोटीत झळकावले पहिले शतक

…म्हणून अडवाणींना भारतरत्न पुरस्कार दिला!, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

NIACL Bharti 2024 l कित्येक तरुणांचं सरकारी नोकरीच स्वप्न होणार साकार! या विभागात सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर