“मला हाकलवून लावायची गरज नाही मी आधीच राजीनामा…” छगन भुजबळांचा धक्कादायक दावा

Chhagan Bhujbal | गेल्या काही दिवसांपासून मराठा बांधव सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र हवं असून राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. यावर मराठा समाजाने जल्लोष केला. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) नाराज आहेत. यावरून भुजबळांना अनेक बाजूनं टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत.

मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात सामावून न घेता वेगळं आरक्षण द्यावं अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली. मात्र सरकारने यावर अध्यादेश काढल्याने मराठा बांधवांनी जल्लोष केला. यावर आता सत्ताधारी तर काही विरोधी नेत्यांनी छगन भुजबळ यांना धारेवर धरलं आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांचा भुजबळांवर  हल्ला

शिंदे गटाचे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय गायकवाड म्हणाले की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, त्यांच्या कंबरेत लाथ घाला असं वक्तव्य करत त्यांनी भुजबळांवर टीका केली, यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ? (Chhagan Bhujbal)

अहमदनगर येथे शनिवारी ओबीसी एल्गार मेळावा होता, त्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मी याआधीच राजीनामा दिला असल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे.

“मीआधीच राजीनामा दिला”

भुजबळ म्हणाले की मी “17 नोव्हेंबरला अंबड येथे ओबीसी एल्गार रॅलीसाठी आलो होतो. त्याआधीच म्हणजे 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला. त्यामुळे आता मला कोणीच हाकलायची गरज नाही. मी स्वत: राजीनामा दिला” असल्याचं ते सभेमध्ये म्हणाले आहेत.

“म्हणून मी शांत होतो”

“राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कुठेही न बोलण्याबाबत सांगितलं होतं, म्हणून मी दीड महिने शांत होतो. यामुळे आता मला मंत्रिमंडळातून हाकलवून द्यायची गरज नाही, मी राजीनामा दिला असून शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार”, असल्याचं ते म्हणाले आहेत.

News Title – chhagan bhujbal resign of minister role

महत्त्वाच्या बातम्या

“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

‘ही’ लक्षणे ठरू शकतात हृदयासाठी धोक्याची घंटा; आताच व्हा सावध

अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…

“राज्यात गुंडराज सुरू, उद्या मलाही गोळ्या झाडतील…”

आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!