गणपत गायकवाड अखेर ‘या’ तारखेपर्यंत गजाआड, काय घडलं कोर्टात?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikawad firing | उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी (Ganpat Gaikawad firing) शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर उल्हासनगर कोर्टानं गणपत गायकवाड यांना १४ तारखेर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याने गणपत गायकवाड यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं आहे.

गणपत गायकवाड गजाआड (Ganpat Gaikwad Firing)

उल्हासनगर कोर्टानं गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर प्रकरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. यावेळी आरोपी आणि सरकारी वकिलांनी युक्तीवाद सादर केला आहे. यावेळी ए ए निकम न्यायाधीश असून त्यांनी दोन्ही वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला आहे.

गणपत गायकवाडच्या (Ganpat Gaikwad firing) वकिलांचा युक्तिवाद

आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गणपत गायकवाड यांच्या बॉडीगार्डकडे सर्व्हिस रिवॉल्वर आहे. तो आमदारांच्या सुरक्षेसाठी २४ तास असतो, यामध्ये कोणालाही जीवे मारण्याचा उद्देश नसल्याचा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आला आहे. यावेळी गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी आरोपीच्या वकिलांनी सीसीटीव्ही व्हिडीओ कसा व्हायरल झाला? असा सवाल केला. गायकवाड हे सराईत गुन्हेगार नाहीत ते लोकप्रतिनिधी आहेत असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे.

यावर आता सरकारी वकिलांनी देखील युक्तीवाद केला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याबाबत कलम लावण्यात आलं आहे. आरोपींना ६ गोळ्या मारल्या आहेत, यासाठी जखमी होणं गरजेचं नाही, गोळ्या मारण्याचा प्रकार म्हणजे हत्येचा प्रयत्न असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला आहे.

“सीसीटीव्ही व्हिडीओ सुरक्षित ठेवा”

आरोपींच्या वकिलांनी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही व्हिडीओ सुरक्षित ठेवण्याबाबत सांगितलं आहे. याआधी अनेकजण तक्रार नोंदवण्यासाठी येऊन गेले मात्र त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा दावा आरोपींच्या वकिलांनी केली आहे.

अखेर गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांनी दिली कबूली

महेश गायकवाडवर आरोपी गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, यावर आता गणपत गायकवाडनं “माझा कोणताही कट नव्हता. माझ्यावर मारहाणीचा कलम का लावला? माझ्या मुलाला का अडकवण्यात आलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

News Title – Ganpat Gaikwad Firing case

महत्त्वाच्या बातम्या

“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

‘ही’ लक्षणे ठरू शकतात हृदयासाठी धोक्याची घंटा; आताच व्हा सावध

अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…

“राज्यात गुंडराज सुरू, उद्या मलाही गोळ्या झाडतील…”

आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!