NZ vs SA, Rachin Ravindra l सध्या सर्वच क्रिकेटप्रेमी आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सध्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना आज माऊंट मानुगनई येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार युवा फलंदाज रचिन रवींद्रने शानदार खेळी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) या शानदार खेळीने चेन्नई सुपर किंग्जला मोठा फायदा होणार असल्याचे दिसत आहे.
NZ vs SA, Rachin Ravindra l रचिन रवींद्रने कसोटी कारकिर्दीत झळकावले पहिले शतक :
रचिन रवींद्रने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रचिन रवींद्रने नाबाद 211 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 118 धावा केल्या आहेत. आता रचिन सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 2 गडी गमावून 258 धावा केल्या होत्या आहेत. (NZ vs SA, Rachin Ravindra)
NZ vs SA, Rachin Ravindra l रचिनचे विश्वचषक 2023 पासून नशीब चमकले :
रचिन रवींद्रच्या कारकिर्दीत 2023 च्या विश्वचषकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुखापतग्रस्त केन विल्यमसनच्या जागी किवी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या रचिनने संपूर्ण विश्वचषकात एकामागून एक अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत.
रचिनने विश्वचषकात तीन शतके झळकावत एकूण 578 धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीनंतर चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्सने त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात आपल्या संघामध्ये समाविष्ट केले आहे.
रवीन रचीन (Rachin Ravindra) अजूनही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना रचिनची ही शानदार फलंदाजी पाहून खूपच आनंद झाला आहे. तसेच आयपीएल 2024 मध्येही रचीनची बॅट अशीच कामगिरी करत राहावी अशी आशा चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
News Title : NZ vs SA, Rachin Ravindra centuries
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI कडून Virat Kohli बाबत मोठे अपडेट; टीम इंडियासाठी ‘ही’ आनंदाची बातमी
Investment | केवळ व्याजाच्या पैशातून कमवा लाखो रूपये; पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत बंपर परतावा
Ram Mandir | रामललाला 11 दिवसांत 11 कोटी रुपयांचे दान; 25 लाख भाविकांची अयोध्येला भेट