Yogi Adityanath | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगतात. तसेच महिलांची छेड काढणाऱ्यांना त्यांनी भरसभेत इशारा दिला आहे. महिलांच्या सुरक्षेची ग्वाही देताना ते म्हणाले की, जर कोणी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, बहिणीची किंवा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला, तर पुढील चौकातच पोलीस त्याला पकडतील.
महिलांची छेड काढणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जर कोणी एखाद्या बहिणीची-महिलेची छेड काढली तर त्याच्या पुढच्याच चौकात पोलीस त्याला पकडतील अन् योग्य ती कारवाई करतील. कोणताच नराधम पळून जाऊ शकणार नाही. त्याने छेड काढण्याचे धाडसही केले तर राम नाम सत्य है, असे योगींनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे कौतुक
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी राज्यातील मगघरमधील संत कबीर यांच्या समाधीला भेट दिली. यावेळी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, जेव्हा देश शक्तिशाली असतो तेव्हा तो समृद्धही होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. भाजप पुन्हा केंद्रात सत्तेवर आल्यास भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल.
तसेच समृद्ध देशात 24 कोटी लोक आणि राज्यातील 6 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर गेले आहेत. कोणताही भेदभाव न करता सर्वांना योजनांचा लाभ मिळत आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी 360 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
Yogi Adityanath यांचा इशारा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, संत कबीर नगर आमचे कॉलेज आहे, त्यासाठी योग्य ती जागा निवडा. त्यासाठी सुरक्षिततेचे वातावरण देखील असायला हवे. एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर एकाच ठिकाणी असेल तर प्रत्येक ठिकाणची माहिती संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सीसीटीव्हीद्वारे गोळा केली जाईल.
नराधमांना इशारा देताना ते म्हणाले की, जर कोणी दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. जर कोणी बहिणीचा किंवा मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्याला पुढच्या चौकात पकडतील आणि तो पळून जाऊ शकणार नाही. मग त्याचे ‘राम नाम सत्य है’ हे निश्चित असेल.
News Title- Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has warned those who harass women
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI कडून Virat Kohli बाबत मोठे अपडेट; टीम इंडियासाठी ‘ही’ आनंदाची बातमी
Investment | केवळ व्याजाच्या पैशातून कमवा लाखो रूपये; पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत बंपर परतावा
Ram Mandir | रामललाला 11 दिवसांत 11 कोटी रुपयांचे दान; 25 लाख भाविकांची अयोध्येला भेट
Poonam Pandey | मृत्यूची खोटी बातमी पसरवणं भोवलं; पोलिसांत तक्रार, मॅनेजरसोबत रचला होता कट