NIACL Bharti 2024 l आजकाल वाढत्या बेरोजगारी पाहता तरुणवर्ग सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा देखील जास्त प्रमाणात वाढली आहे. मात्र अशातच आता कित्येक तरुणांनाच सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होणार आहे. कारण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 300 सहाय्यक पदे भरली जाणार आहेत. सरकारने यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात 1 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करायला सुरवात झाली आहे. तर उमेदवारांना 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. सरकारने सहाय्यक पदाची परीक्षा ही 2 मार्च 2024 रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
New India Assurance Recruitment 2024 l एकूण रिक्त जागा :
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सहाय्यक भरती 2024 अंतर्गत 300 पदे भरली जाणार आहेत. तसेच या भरती अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 149 पदे, ईडब्ल्यूएससाठी 30 पदे, ओबीसीसाठी 10 पदे, अनुसूचित जातीसाठी 68 पदे आणि अनुसूचित जमातीसाठी 43 पदे भरली जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी किती अर्ज शुल्क असणार :
या भरती अंतर्गत भरतीसाठी सामान्य, OBC आणि EWS साठी अर्ज फी 850 रुपये असणार आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये असणार आहे.
NIACL Bharti 2024 l वयोमर्यादा काय असणार :
NIACL प्रक्रियेसाठी किमान वय 21 वर्षे असेल तर कमाल वय 30 वर्षे असणार आहे. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत देण्यात आली आहे.
NIACL Bharti 2024 – शैक्षणिक पात्रता व निवड प्रक्रिया कशी आहे :
NIACL या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच सहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रिलियम, मुख्य, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेनंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
NIACL Bharti 2024 l वेतनश्रेणी :
सहाय्यक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला 37,000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
News Title- New India Assurance Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI कडून Virat Kohli बाबत मोठे अपडेट; टीम इंडियासाठी ‘ही’ आनंदाची बातमी
Investment | केवळ व्याजाच्या पैशातून कमवा लाखो रूपये; पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत बंपर परतावा
Ram Mandir | रामललाला 11 दिवसांत 11 कोटी रुपयांचे दान; 25 लाख भाविकांची अयोध्येला भेट
Poonam Pandey | मृत्यूची खोटी बातमी पसरवणं भोवलं; पोलिसांत तक्रार, मॅनेजरसोबत रचला होता कट