…म्हणून अडवाणींना भारतरत्न पुरस्कार दिला!, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lal Krishna Advani | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपराष्ट्रपती लाल कृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच दिवंगत नेते कर्पुरी ठाकूर यांना देखील भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. यावर देशभरातून अभिनंदन केलं जात आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अडवाणींचं अभिनंदन केलं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पुरस्कार देण्यासाठी उशीर केला असल्याचं म्हटलं आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. आयोध्येतील राम मंदिरासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी अनेक रथयात्रा केल्या होत्या, यामुळे भाजपला उंचीवर नेऊन ठेवण्यामागं त्यांचा हात आहे. मात्र एकेकाळी लाल कृष्ण अडवाणी यांनाच पक्षातून बेदखल केलं, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नगर येथे पत्रकार परिषदेत केलं. यामुळे त्यांना भारत रत्न देण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला.

अडवाणींवर (Lal Krishna Advani) प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा

अडवाणी यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती जीना यांच्या कबरीवर फुले वाहिली होती. तुम्ही त्यांना पक्षातून बाहेर काढलं होतं. त्यातून आता अडवाणी(lal krishna advani) यांना भारतरत्न देऊन दोषमुख्त केलं का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. पुरस्कार देणं हा भाजपचा फोर्स असल्याचं खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर भुजबळांवर बरसले

नगरमध्ये बोलत असताना त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना धारेवर धरलं आहे. “ज्या ज्या ओबीसी महासंघाने बोलावलं त्यांच्या सभेला मी गेलो. मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही असा आमचा प्रयत्न असेल’. भुजबळांचं नाव न घेता ते म्हणाले की “गरज नसताना तेढ निर्माण करायची गरज का आहे? गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्ता द्यावी, आम्ही तोडगा देतो. त्यामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं असेल”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“आमदार राजे नाहीत लोक प्रतिनिधी आहेत” 

उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात झालेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड प्रकरणाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमदार स्वत:ला राजे समजतात. ते राजे नाहीत तर ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी लोकप्रतिनिधीसारखं राहावं”, असं म्हणत त्यांनी गणपत गायकवाड प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

जागावाटपासाठी घाई नाही-

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते माध्यामांशी बोलत असताना म्हणाले की “आधी आरक्षण, जाती आणि शेती प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर जागावाटपावर आम्ही चर्चा करणार आहे,” असं ते माध्यमांशी बोलत होते.

News Title – lal krishna advani bharat ratna new update

महत्त्वाच्या बातम्या

आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!

“एकामुळे आयुष्य खराब झालंय…”, सानिया मिर्झाच्या पोस्टची चर्चा

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर!

शरद मोहोळच्या हत्येनंतर मारेकऱ्याचं देवदर्शन, ‘या’ राज्यातील मंदिरांमध्ये केला अभिषेक

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न जाहीर!