Investment | दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या काळात प्रत्येकजण पैशांचे नियोजन कसे करावे यावर भर देताना दिसतो. आजच्या काळात प्रत्येकाला करोडपती व्हायचे आहे. मात्र सततच्या वाढत्या महागाईमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणे फार कमी लोकांना जमते. कारण महागाईच्या तुलनेत बहुतेक लोकांचा पगार खर्च भागवण्यासाठी कमी पडतो. यावर एक उपाय म्हणून सर्वजण गुंतवणुकीकडे पाहतात. आताच्या घडीला काही प्रमाणात बचत केली तरी आगामी काळात त्यांचा चांगला परतावा मिळू शकतो.
पण, गुंतवणूक नेमकी कुठे करावी असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आपण कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवत आहोत का? हा प्रश्न सर्वसामान्यांना भिडसावत असतो. आज आपण अशाच एका योजनेबद्दल भाष्य करणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही फक्त 5 वर्षात मोठा फंड गोळा करू शकता. त्याच्या व्याजातून तुम्ही मोठी रक्कम कमवाल आणि तुमचा वृद्धापकाळ आरामात घालवू शकता.
व्याजाच्या पैशातून कमवा लाखो रूपये
महागाईच्या तुलनेत बहुतेक लोकांचा पगार खर्च भागवण्यासाठी कमी पडतो. जर एखाद्याने काही प्रमाणात बचत केली तरी त्याच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहते की तो पैसा त्याने कुठे गुंतवावा? आज आपण अशाच एका योजनेबद्दल भाष्य करणार आहोत, ज्याच्या व्याजातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. या योजना कमी वेळेत चांगला नफा देण्याची ग्वाही देतात. परंतु, ‘टाइम डिपॉझिट’ ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला हमी परतावा मिळतो. तसेच यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ देखील मिळवू शकता. यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
Investment साठी पोस्टाची भारी योजना
दरम्यान, पोस्ट ऑफिस ‘टाइम डिपॉझिट’मध्ये 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. हे वेगवेगळ्या वर्षांसाठी वेगवेगळे रिटर्न देते. उदाहरणार्थ, तुम्ही त्यात एका वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.8% परतावा मिळेल. तर 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.9% परतावा दिला जातो आणि त्याचप्रमाणे 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5% परतावा मिळतो. या योजनेत तुमचे व्याज दर महिन्याला मोजले जाते, जे तुम्हाला दरवर्षी मिळत राहते.
आता आपण ही योजना उदाहरणासह समजून घेऊया, जर तुम्ही 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिटमध्ये 5 लाख रुपये गुंतवले. आता त्यावर 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर म्हणजेच 5 वर्षांनी तुम्हाला 7,24,149 रुपये मिळतील. ज्यामध्ये 5 लाख रुपये तुमची गुंतवणूक आहे आणि उर्वरित तुमचे व्याज उत्पन्न आहे. यामध्ये तुम्हाला ते आणखी एकदा वाढवण्याची सुविधा देखील मिळते. याचा अर्थ असा की, जर तुम्ही ते आणखी 5 वर्ष वाढवले तर तुम्ही मॅच्युरिटीवर 10,00,799 रुपये कमवू शकता.
News Title- Time Deposit Scheme of Post Office can earn good returns to the investor
महत्त्वाच्या बातम्या –
Ram Mandir | रामललाला 11 दिवसांत 11 कोटी रुपयांचे दान; 25 लाख भाविकांची अयोध्येला भेट
Poonam Pandey | मृत्यूची खोटी बातमी पसरवणं भोवलं; पोलिसांत तक्रार, मॅनेजरसोबत रचला होता कट
Virat Kohli आणि अनुष्का लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार; माजी खेळाडूचा मोठा खुलासा