बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मतदार बांधव याचीच वाट पाहत आहेत. काही महिन्यांआधी बारामतीच्या बालेकिल्ल्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे याच शरद पवार गटाकडून उमेदवार असणार असल्याचं जाहिर झालं आहे. मात्र अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याबाबत अजूनही कोणतीच माहिती समोर आली नाही. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना आपल्या गटाचा उमेदवार उभा करणार असल्याचं सांगितलं असून त्यालाच मत द्या, असं आवाहन केलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar)असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. यामुळे आता सुप्रिया सुळेंविरोधात खासदारकीला अजित पवार कोणता उमेदवार उभा करणार? याकडे बारामती मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. अजित पवार हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे गेले असताना त्यांनी बारामतीकरांना माझ्य़ा उमेदवाराला खासदारकीसाठी उभं केलं जाणार असून त्यांना मत द्या, असं अवाहन केलं.

काय म्हणाले अजित पवार? (Ajit Pawar)

“मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही केवळ मी तुमच्याकडं मत मागतो. इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका”, असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. “मला बारामतीला स्वच्छतेबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचं बक्षिस मिळवून द्यायचं आहे. यासाठी पचापच थुकू नका, फुले तोडू नका, कॅनेलमध्ये घाण टाकू नका”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

“शब्दाला किंमत आली”  

“एका व्यवसायिकानं विकासासाठी एक कोटी दिले आहेत. आपल्या शब्दाला आता किंमत आली आहे. एका बाजूला अजित सांगतोय दुसऱ्या बाजूला वरिष्ठ सांगतात, एवढ्या दिवस वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “आपला खासदार निवडूण दिला तर मोदींना सांगता येईल की माझ्या लोकांनी खासदार दिला. आता माझी कामं झाली पाहिजेत. आपल्या अडीला कोण उपयोगी येतो त्याचा विचार करा”, असं अजित पवार म्हणाले.

“मी उमेदवार आहे असं समजून मत द्या”

बारामती मतदारसंघासाठी अद्यापही सुप्रिया सुळेंविरोधात कोणता उमेदवार अजित पवार उभा करणार याबाबत कोणतीही खबर नाही. यावर अजित पवार यांनी बारामतीकरांशी बोलताना मी उमेदवार आहे असं समजून उमेदवाराला मतदान करा. अशी भावनिक साद घातली आहे, तर अजित पवारांच्या पत्नी खासदारकीच्या उमेदवारासाठी पात्र असल्याच्या चर्चा आहेत.

अजित पवारांच्या पत्नीची चर्चा

बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंविरोधात खासदारकीला अजित पवार कोणाला संधी देणार याकडे केवळ बारामतीच नाहीतर राज्याचं लक्ष लागलं आहे. यावर अजित पवार यांनी “मीच उमेदवार समजून मत द्या”, असं अवाहन मतदारांना केलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं देखील नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. यावर “मला कौल मिळाला तर मी पुढील कामांसाठी बांधील असेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – ajit pawar talk baramati assembly election

महत्त्वाच्या बातम्या

NZ vs SA, Rachin Ravindra l CSK चा स्टार खेळाडू रचिन रवींद्र जोमात; कसोटीत झळकावले पहिले शतक

…म्हणून अडवाणींना भारतरत्न पुरस्कार दिला!, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

NIACL Bharti 2024 l कित्येक तरुणांचं सरकारी नोकरीच स्वप्न होणार साकार! या विभागात सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर

Yogi Adityanath | जर कुणी मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर ‘राम नाम सत्य है’, मुख्यमंत्र्यांचा इशारा

BCCI कडून Virat Kohli बाबत मोठे अपडेट; टीम इंडियासाठी ‘ही’ आनंदाची बातमी