Valentines Day 2024 l व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याआधी प्रेमाच्या सातही दिवसाचे महत्व जाणून घ्या

Valentines Day 2024 l 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे पर्यंत चालतो. या आठवड्यात टेडी डे, चॉकलेट डे असे विविध दिवस साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन वीक हा कप्लससाठी एक प्रकारचा सणच आहे. हा आठवड्याला 7 फेब्रुवारीपासून म्हणजेच रोज डे पासून सुरू होतो. रोझ डेच्या दिवशी लोक एकमेकांना गुलाबाची फुले पाठवून आपल्या भावना व्यक्त करतात.

रोझ डे : 7 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे. या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. या रोमँटिक दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल रंगाचे गुलाब देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे.

प्रपोज डे : 8 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस असतो . या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. कोणावर तरी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. त्यामुळे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा डे साजरा केला जातो.

चॉकलेट डे : 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा करण्याची परंपरा आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी किंवा खास मित्राला चॉकलेट्स गिफ्ट देऊन हा दिवस खास बनवू शकतात.

टेडी डे : 10 फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या प्रियसीला गोंडस टेडी देऊन हा दिवस साजरा करू शकता. हा दिवस व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस आहे.

प्रॉमिस डे : 11 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस डे असतो. या दिवशी प्रेमी आणि विवाहित जोडपे आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन देतात. तुमच्या जोडीदाराला असेच काहीतरी वचन देऊन तुम्हीही हा दिवस खास बनवू शकता.

हग डे : 12 फेब्रुवारीला हग डे साजरा करतात. असे म्हणतात की प्रेमळ हग दिल्याने सर्व दुःख आणि कटुता कमी होते. व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक प्रेमळ मिठी मारून साजरा करा. (Valentines Day 2024)

किस डे : व्हॅलेंटाईन वीकच्या सातव्या दिवशी किस डे साजरा केला जाण्याची परंपरा आहे. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना एक किस द्या जेणेकरून ते तुमच्यासाठी सर्वस्व आहे. याशिवाय कपल्स किस देऊन एकमेकांवरचे तुमचे प्रेम आणि भावना व्यक्त करू शकता.

Valentines Day 2024 l व्हॅलेंटाईन डे : प्रेमी कपल्ससाठी सर्वच आनंदाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे कपल्स आणि लव्ह बर्ड्ससाठी खूप खास असतो आणि प्रत्येकाला हा दिवस आपल्या प्रेमासोबत घालवायला आवडतो. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना स्पेशल सरप्राईज देतात. (Valentines Day 2024)

News Title : Valentines Day 2024

महत्त्वाच्या बातम्या – 

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना होणार?

छगन भुजबळांच्या राजीनाम्याची बातमी ऐकताच मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Share Market This Week l अर्थसंकल्पानंतर बाजार नवा उच्चांक गाठणार? होल्डर्सचे लक्ष असणार

“मला हाकलवून लावायची गरज नाही मी आधीच राजीनामा…” छगन भुजबळांचा धक्कादायक दावा

गणपत गायकवाड अखेर ‘या’ तारखेपर्यंत गजाआड, काय घडलं कोर्टात?