Indian Railways l कोणत्या रेल्वे स्टेशनवर किती वेळ ट्रेन थांबणार? हे कसं ठरवलं जातं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Indian Railways l आपल्याला माहित आहे की भारताबरोबरच जगभरातील अनेक खंडप्राय देशामध्ये दळणवळणाच्या सोयीसाठी रेल्वेचं मोठे जाळं तयार करण्यात आलेलं आहे. एवढेच नव्हे तर भारतीय रेल्वे आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रवाश्यांना सेवा देते. यासोबतच विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती ही भारतीय रेल्वेलाच मिळते. कारण अर्थातच रेल्वेच्या माध्यमातून कमी दरांत आरामदायी प्रवास खूप सोप्या पद्धतीने करता येतो.

Indian Railways l भारतीय रेल्वेचा टॉपचा क्रमांक :

याशिवाय भारतात सर्वांत जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या क्षेत्रांमध्येही भारतीय रेल्वेचा टॉपचा क्रमांक लागतो. रोजचा रोज संपूर्ण देशात हजारो रेल्वेगाड्यांची ये-जा सुरू असते तर या माध्यमातून दररोज कोट्यावधी नागरिक प्रवास करत असतात.

तसेच कोणत्याही सार्वजनिक वाहतूक साधनाप्रमाणे ट्रेन्स देखील निश्चित केलेल्या स्टेशन्सवर थांबे घेतात. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मनात निर्माण होतो की, कोणती ट्रेन कोणत्या स्टेशनवर किती वेळ थांबणार, हे कसं निश्चित केलं जातं?

Indian Railways l जाणून घेऊयात याबाबत थोडक्यात माहिती :

देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी प्रामुख्याने रेल्वेचा वापर केला जातो. या माध्यमातुन दिवसभरात लाखो लोकांचा प्रवास हा चालू असतो. आपल्याला हे हि माहिती आहे की रेल्वेने प्रवास करणारे हे सर्व प्रवासी तिकीट काढलेल्या स्टेशनवर उतरतात. तर भारतात हजारो रेल्वे स्टेशन्स असे आहेत या पैकी काही ठिकाणी ट्रेन हि साधारण पाच मिनिटं थांबते तर काही ठिकाणी फक्त दोन मिनिटं थांबते.

म्हणजेच प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबण्याची वेळ हि वेगवेगळी असते. या मागे प्रमुख कारण म्हणजे तिकिटांची विक्री हे असते. ज्या स्टेशनपासून प्रवास सुरू करण्यासाठी जास्त तिकिटांची खरेदी मोठ्या प्रमाणात असते त्या ठिकाणी ट्रेन जास्त वेळ थांबते असे सांगण्यात येते

या शिवाय, रेल्वे क्रॉसिंग होत असेल किंवा इंजिन ड्रायव्हर आणि इतर स्टाफची ड्युटी बदलत असेल तर एखाद्या स्टेशनवर ट्रेन जास्त वेळ थांबू शकते असे सांगतले जाते. तर आपल्याला माहिती आहे कि काही स्टेशनवर ट्रेनचं इंजिनदेखील बदललं जातं, अशा परिस्थितीत संबंधित स्टेशनवर ट्रेन जास्त वेळ थांबते. काही वेळा ट्रेनमध्ये अचानक बिघाड झाल्यास किंवा एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास थांबा नसलेल्या स्टेशनवरदेखील ट्रेन थांबवली जाते.

News Title : How long will the train stop at which railway station?

महत्त्वाच्या बातम्या – 

Valentines Day 2024 l व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याआधी प्रेमाच्या सातही दिवसाचे महत्व जाणून घ्या

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना होणार?

छगन भुजबळांच्या राजीनाम्याची बातमी ऐकताच मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Share Market This Week l अर्थसंकल्पानंतर बाजार नवा उच्चांक गाठणार? होल्डर्सचे लक्ष असणार

“मला हाकलवून लावायची गरज नाही मी आधीच राजीनामा…” छगन भुजबळांचा धक्कादायक दावा