“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Jitendra Awhad | राज्यामध्ये सत्तासंघर्षावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. काही महिन्यांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांची म्हणजेच शरद पवार यांची साथ सोडली आहे. त्यांनी आपला वेगळा गट तयार केला आहे. आता ते खुद्द आपल्या बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देखील देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते बारामती येथे गेले असता, त्यांनी शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं असता यावर पुन्हा अजित पवार यांच्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी टीका केली.

अजित पवार हे आपल्या बारामती मतदारसंघामध्ये गेले. त्यांनी यावेळी आगामी लोकसभा मतदारसंघामध्ये बोलत असताना लोकसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. लवकरच लोकसभेसाठी उमेदवार देणार आहे. मी समजूनच मतदान करा, असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका. शेवटची निवडणूक आहे, असं म्हणत भावनिक आवाहनाला बळी पडाल, कधी होतेय शेवटची निवडणूक असं ते म्हणाले. यावर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

“काकांच्या मरण्याची वाट पाहता का?”  

शेवटची निवडणूक आहे, असं ते म्हणतील म्हणून या भावनिक आवाहनाला बळी पडू नका. कधी शेवटची निवडणूक होईल? असा सवाल अजित पवार यांनी केला. त्यावर आव्हाडांनी अजित पवार यांचे कान टोचले आहेत. “काकाच्या मरण्याची वाट पाहता का? जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, अजित पवार यांनी हद्द पार केली ते शरद पवार यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“काकाच्या मृत्यूची वाट पाहता का? अजित पावर यांनी आज हद्द पार केली. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना कीतपत योग्य आहे. त्यांचे विचार अजरामर  राहतील आणि ते देखील अजरामर राहतील”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. “भावनिक आवाहन करता येणाऱ्या काळामध्ये बारामतीकर तुम्हाला तुमची औकात दाखवतील”, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

“काकूच्या कपाळावरचं कुंकू पुसायची वाट पाहत आहात”

आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? शरद पवार हे देशाचे नेते आहेत. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तरी कोण ओळखतं का? असा सवाल आव्हाडांनी केला आहे. काकूच्या कपाळावरचं कुंकू पुसायची वाट पाहत आहात. मी तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते”, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवार यांचे कान टोचले आहेत.

अजित पवार महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते – जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)

शरद पवार यांचे निर्णय हिताचे आहेत. अजित पवारांनी एक तरी निर्णय दाखवावा. अजित पवार यांनी दिल्लीतील कोणतंही स्वत:चं भाषण दाखवावं. शरद पवार अजित पवारांना ओळखताना चुकले आहे. ज्या कुटुंबानं तुम्हाला सर्व दिलं. ज्या माऊलीनं तुम्हाला सर्व दिलं. तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघता का? असा दावा करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

News Title – jitendra awhad aggressive on ajit pawar

महत्त्वाच्या बातम्या

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना होणार?

छगन भुजबळांच्या राजीनाम्याची बातमी ऐकताच मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Share Market This Week l अर्थसंकल्पानंतर बाजार नवा उच्चांक गाठणार? होल्डर्सचे लक्ष असणार

“मला हाकलवून लावायची गरज नाही मी आधीच राजीनामा…” छगन भुजबळांचा धक्कादायक दावा

गणपत गायकवाड अखेर ‘या’ तारखेपर्यंत गजाआड, काय घडलं कोर्टात?