Ganpat Gaikwad | भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाडवर गोळ्या झाडल्या आहेत. त्यांनी वैयक्तिक वादातून हे कृत्य केलं असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर गणपत गायकवाडला हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हिललाईन येथे गणपत गायकवाडनं महेश गायकवाडवर गोळीबार केला, दरम्यान गणपत गायकवाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
गणपत गायकवाडवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल (Ganpat Gaikwad)
गणपत गायकवाडवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या प्रकरणामध्येच त्यांच्यावरील असलेल्या गुन्ह्यापैकी हा आणखी एक गुन्हा असल्याची माहिती आता समोर येत आहे. एका शेतकऱ्यानं हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. यामुळे गणपत गायकवाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
द्वारली गावातील एका जमीन मालकाला गणपत गायकवाड यांनी जेरीस आणलं होतं. त्याला जातीवाचक वक्तव्य केलं होतं. यामुळे शेतकऱ्यानं पोलिस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. 31 जानेवारीला त्यानं दुपारी 1 च्या सुमारास जातीवाचक वक्तव्य केलं असून शिवीगाळही केली, असा आरोप आता शेतकऱ्यानं केला आहे. यामुळे आता गणपत गायकवाड यांच्याबाबत आणखी काही धक्कादायक आरोप बाहेर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जमिनीच्या वादातून गोळीबार
गणपत गायकवाडने जमिनीच्या वादातून महेश गायकवाडवर गोळीबार केला. महेश गायकवाड जाग्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांच्यामध्ये वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी ते दोघेही पोलिस ठाण्यामध्ये आले, मात्र तिथं वाद निवळण्याऐवजी पेटला असून गणपत गायकवाडनं थेट फायरिंग केली.
महेश गायकवाड जखमी
महेश गायकवाडवर सहा गोळ्या चालवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना ठाण्यातील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून दोन गोळ्या काढण्यात आल्या आहेत. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गणपत गायकवाड गजाआड (Ganpat Gaikwad)
गणपत गायकवाड यांना हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये 14 तारखपर्यंत अटक करण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांच्याकडून आणखी काय माहिती काढता येईल. यासाठी पोलिसांनी गणपत गायकवाड यांनी जेरबंद केलं आहे.
News Titles – Ganpat Gaikwad On Atrocity
महत्त्वाच्या बातम्या