Irfan Pathan । भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पठाण समालोचनाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता तो त्याने केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. अलीकडेच इरफानने त्याच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी पत्नीला शुभेच्छा देताना पठाणने प्रथमच सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नीचा चेहरा दाखवला.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पठाणने पत्नीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इरफान पठाणच्या पत्नीने यावेळी कोणताही हिजाब घातला नाही आणि चाहत्यांनी या क्रिकेटरच्या सुंदर पत्नीचा चेहरा पहिल्यांदाच पाहिला. अभिनेता रितेश देखमुखने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून इरफान आणि त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
खरं तर 2016 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकलेल्या इरफान पठाणच्या पत्नीचे नाव सफा बेग आहे. लग्नानंतर इरफान पठाणने अनेकदा पत्नीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, प्रत्येक फोटोत त्याची पत्नी कधी हिजाब घालून तर कधी तोंडावर हात ठेवून चेहरा लपवताना दिसली.
Infinite roles mastered by one soul – mood booster, comedian, troublemaker, and the constant companion, friend, and mother of my children. In this beautiful journey, I cherish you as my wife. Happy 8th my love ❤️ pic.twitter.com/qAUW8ndFAJ
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 3, 2024
लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त इरफान पठाणने चाहत्यांची इच्छा पूर्ण करत त्याच्या पत्नीची झलक दाखवली. त्याने प्रथमच पत्नी सफाचा चेहरा दाखवला आहे. पत्नीसोबतचा फोटो शेअर करताना इरफान पठाणने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. इरफानने लिहिले की, अनेक पात्र एकाच व्यक्तीने साकारली आहेत. माझ्या मुलांसाठी मूड बूस्टर, कॉमेडियन, सोबती, मित्र आणि आई. या सुंदर प्रवासात तू माझी पत्नी म्हणून सोबत आहेस याचा खूप आनंद वाटतो.
Irfan Pathan ची खास पोस्ट
इरफान पठाणच्या या सुंदर फोटोवर चाहते त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तर देत आहेतच पण त्याचबरोबर त्याच्या पत्नीच्या सौंदर्याचे देखील कौतुक करत आहेत. चाहते इरफानची पत्नी सफा बेगची तुलना बॉलिवूड अभिनेत्रींसोबत करत आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने 3 फेब्रुवारीला त्याच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला. याच निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला होता. पठाण सोशल मीडियाच्या माध्यमाधून सतत क्रिकेट विश्वातील सद्य घडामोडींवर भाष्य करत असतो.
News Title- Former Team India player Irfan Pathan has revealed his wife Safa Baig’s face for the first time
महत्त्वाच्या बातम्या –
Shraddha Kapoor लवकरच करणार लग्न?, अभिनेत्रीने गोड फोटो पोस्ट करत दिली माहिती
“गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का नाही काढलं?”
भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई!
“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ