Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime News | कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. येथील हिरेगे गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन 12 वर्षे बंद खोलीत डांबले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकत पीडित महिलेची सुटका केली आणि आरोपीला अटक केली. सुमा आणि सन्नलैया यांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

खरं तर सुमा ही आरोपीची तिसरी पत्नी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. लग्न झाल्यापासूनच सन्नलैया सुमावर संशय घेत होता. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यानंतर त्याने तिला घरातील एका खोलीत कोंडून ठेवले होते. पती सन्नलैयाचा छळ सहन न झाल्याने पहिल्या दोन बायका आरोपीला सोडून गेल्या होत्या.

पत्नीवर संशय, 12 वर्षे खोलीत डांबलं

पतीने दाराला तीन कुलूप लावून पत्नीला कोणाशीही बोलू नकोस असे सांगितले होते. तसेच तिला घराबाहेरील शौचालयाचा वापर करण्यास मनाई केली. पतीला खोलीत बाहेर येण्यास मनाई होती. तिला शौचास जाण्यासाठी आरोपी बंद खोलीत बादली ठेवून त्याची विल्हेवाट लावत असे. यामुळे दुखावलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

स्थानिक पोलिसांच्या पथकाने घरावर छापा टाकून पीडितेची सुटका केली. आरोपी पतीने पत्नीला धमकी दिली होती की, जर ती घराबाहेर पडली किंवा कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो तिला मारहाण करेल. पीडितेच्या आईने तोडगा काढण्यासाठी स्थानिकांशी संपर्क साधला होता.

Crime News पोलिसांनी केली महिलेची सुटका

पण, आरोपीने ते मान्य केले नाही आणि त्याची क्रूरता सुरूच ठेवली. पीडितेला दोन मुले असून त्यांना आता तिच्या माहेरच्या घरी पाठवण्यात आले आहे. पीडित सुमाने सांगितले की, पतीने तिला कुलूप लावून बंद खोलीत ठेवले आणि मुलांशी देखील उघडपणे बोलू दिले नाही.

पीडितेने सांगितले की, गावातील सर्वजण तिच्या पतीला घाबरतात. रात्री उशिरा घरी येईपर्यंत त्याने माझ्या मुलांना माझ्याजवळ राहू दिले नाही. मला त्यांना एका छोट्या खिडकीतून जेवण द्यावे लागायचे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

News Title- Accused husband keeps wife locked in room for 12 years in Karnataka’s Mysuru, police rescue woman
महत्त्वाच्या बातम्या –

Irfan Pathan नं पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा; रितेश देशमुखनं केली खास कमेंट

Shraddha Kapoor लवकरच करणार लग्न?, अभिनेत्रीने गोड फोटो पोस्ट करत दिली माहिती

“गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का नाही काढलं?”

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई!

“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ