“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey । अभिनेत्री पूनम पांडेने तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून सर्वांनाच धक्का दिला आहे. 2 फेब्रुवारी रोजी तिच्या मॅनेजरने अभिनेत्रीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तिच्या निधनाबद्दल एक पोस्ट शेअर केली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आणि इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पण दुसऱ्या दिवशी पूनम पांडेने सर्वांच्या भावनांची खिल्ली उडवत तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ जारी केला आणि ती जिवंत असल्याचे उघड केले.

तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी हे नाटक केले असल्याची कबुली तिने दिली. पूनम पांडेच्या या कृत्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांसह स्टार्संनी देखील तिच्यावर निशाणा साधला. एवढेच काय तर पूनमवर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. मात्र, आता अभिनेत्रीने यावर स्पष्टीकरणे दिले असून ट्रोलर्संना (Poonam Pandey On Trolling) प्रत्युत्तर दिले आहे. मला प्रसिद्धीची गरज नसल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

मला प्रसिद्धीची गरज नाही – पूनम

खरं तर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्याच्या या अभिनेत्रीच्या पद्धतीवर आता लोक चांगलेच संतापले आहेत. तिने हे जनजागृतीसाठी नाही तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केले असल्याचे लोक म्हणत आहेत. ट्रोल झाल्यानंतर पूनमने यावर मौन बाळगले होते मात्र आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले आहे.

‘बॉलिवूड लाइफ’च्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने एक निवेदन जारी करून म्हटले की, ती या प्रकरणात असंवेदनशील नाही कारण तिने तिच्या आईला घशाच्या कर्करोगाने ग्रस्त पाहिले आहे आणि ते किती कठीण आहे हे तिने अनुभवले आहे. म्हणूनच चांगल्या कारणासाठी काहींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता. एक कर्करोग जो टाळता येण्याजोगा आहे तरीही अनेक महिलांचा मृत्यू होतो.

ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

पूनम म्हणाली की, मी प्रसिद्धीसाठी हे केले नाही कारण मला प्रसिद्धीची गरज नाही. मला माहित होते की लोकांच्या अशा प्रतिक्रियांना सामोरे जावे लागेल पण हे एका चांगल्या कारणासाठी केले. माझ्या मृत्यूची माहिती मिळताच सर्वांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल जाणून घ्यायचे होते आणि अनेकांनी याच्या तळाशी जाऊन माहितीही घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

 

तसेच यामध्ये कोणतीही औषधी कंपनी सहभागी नाही आणि मी हे केवळ जनजागृती करण्यासाठी केले आहे. बरेच लोक गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल बोलत आहेत. बरेच लोक गुगलवर सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय हे शोधत आहेत आणि सोशल मीडियावर अनेक महिलांनी याबाबत विचारणा केली आहे. यासाठी काहीजण HPV लसीकरण घेत आहेत आणि त्याच्या पॅप स्मीअर चाचण्या घेत करत आहेत, असेही पूनमने नमूद केले.

News Title- Actress Poonam Pandey has clarified on trolling following fake news of her death
महत्त्वाच्या बातम्या –

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका

Irfan Pathan नं पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा; रितेश देशमुखनं केली खास कमेंट

Shraddha Kapoor लवकरच करणार लग्न?, अभिनेत्रीने गोड फोटो पोस्ट करत दिली माहिती

“गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का नाही काढलं?”