Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shubman Gill । भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने टीम इंडियासाठी झंझावाती शतक झळकावले. मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या गिलला अखेर मोठी खेळी करता आली. कसोटी फॉरमॅटमध्ये प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शुभमन गिलच्या बॅटमधून मोठी खेळी आली आहे, भारताने दुसऱ्या डावामध्ये 255 धावा केल्या आणि यापैकी 104 धावा शुभमन गिलच्या बॅटमधून आल्या.

गिलवर होती टांगती तलवार

शतकी खेळीमुळे गिलला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सततच्या फ्लॉप शोमुळे संघाबाहेर होण्याची टांगती तलवार शुभमनच्या खांद्यावर होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे, शुभमन गिलने जबरदस्त शतक झळकावून भारताला मजबूत पकड मिळवून दिली. गिल याआधी खराब फॉर्ममधून जात होता, पण आता त्याने दमदार पुनरागमन केले आहे. गिलसाठी ही शेवटची संधी असल्याचे मानले जात होते.

वृत्तसंस्था ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, भारताच्या संघ व्यवस्थापनाने मागील कसोटी सामन्यानंतर शुभमन गिलला स्पष्ट संदेश दिला होता की, विशाखापट्टणम कसोटी सामना ही त्याच्यासाठी शेवटची संधी असू शकते, कारण त्याला नंबर-3 वर खूप संधी मिळाल्या होत्या आणि तो सतत अपयशी ठरत होता.

Shubman Gill ची शतकी खेळी

दरम्यान, शुभमन गिलने त्याच्या कुटुंबीयांनाही याची माहिती दिली होती. शुभमन गिलने सांगितले होते की, मोहालीमध्ये गुजरातविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यानंतर तो कदाचित रणजी ट्रॉफी खेळायला जाईल. पण आता कदाचित असे होणार नाही, कारण शुभमन गिलने विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण शतक झळकावले आहे.

खरं तर शतकी खेळीआधी शुभमन गिल नंबर-3 वर पूर्णपणे फ्लॉप होता आणि त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. यामुळे गिलवर सातत्याने टीका होत होती, एवढेच नाही तर टीम इंडिया चेतेश्वर पुजारालाला त्याच्या जागी संधी देईल अशी चर्चा होती. रवी शास्त्रींपासून अनिल कुंबळेपर्यंत सर्वांनी शुभमन गिलला काहीतरी करून दाखवावे लागेल, असे नमूद केले होते.

इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत शतकी खेळीपूर्वी गिलने केवळ 23, 0 आणि 34 धावा केल्या होत्या. जेव्हापासून चेतेश्वर पुजारा संघाबाहेर झाला आणि गिलला क्रमांक-3 वर खेळण्याची संधी मिळाली तेव्हापासून तो अपयशी ठरला आहे आणि त्याने 10 डावात केवळ 150 धावा केल्या आहेत.

News Title- Had Shubman Gill not scored a century in the second innings of the second Test against England, Shubman Gill would have been out of the Indian team
महत्त्वाच्या बातम्या –

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका

Irfan Pathan नं पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा; रितेश देशमुखनं केली खास कमेंट

Shraddha Kapoor लवकरच करणार लग्न?, अभिनेत्रीने गोड फोटो पोस्ट करत दिली माहिती