ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TCS । देशातील आघाडीची टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सीने कर्मचाऱ्यांसमोर पगारवाढ आणि बढतीसाठी एक अट ठेवली आहे. आता फेब्रुवारी महिना सुरू असून आतापासूनच कर्मचारी वर्गात पगारवाढीची चर्चा रंगत असते. फेब्रुवारी महिना सुरू होताच कार्यालयातील कर्मचारी आणि एचआर टीममध्ये पगारवाढ आणि पदोन्नतीच्या चर्चांना उधाण येते. अशातच कंपनी टाटा कन्सल्टन्सीनेही कर्मचाऱ्यांसमोर पगारवाढ आणि पदोन्नतीसाठी अट ठेवली आहे.

टीसीएसने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला असून सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसला येणे बंधनकारक केले आहे. जर ऑफिसला एखादा कर्मचारी नाही आला तर तो पगारवाढीला मुकेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. TCS ने कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी मोठी अट ठेवली आहे, यामुळे कर्मचारी कपात होणार नसली तरी कर्मचाऱ्यांचा व्याप मात्र वाढणार आहे.

ऑफिसला या तरच पगार वाढेल

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेली टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएस काही काळापासून आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी टीसीएसने या आधी अनेक पावले उचलली आहेत. आता कंपनीचे एक नवे पाऊल आश्चर्यचकित करणारे आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात परत येण्याचा संबंध त्यांच्या पगारात वाढ आणि पदोन्नतीशी जोडला आहे.

वृत्तसंस्था ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘TCS कंपनीने ऑफिस-टू-ऑफिसचे धोरण कडक केले आहे. त्यामुळे किमान पगारवाढ, बढती यासाठी कर्मचाऱ्यांना ऑफिस गाठावे लागणार आहे. एकूणच येत्या काही दिवसांत टीसीएस कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होते किंवा त्यांना पदोन्नती कशी मिळते हे सर्व त्यांच्या कार्यालयात परतण्यावर अवलंबून असणार आहे.

TCS ची कर्मचाऱ्यांसमोर अट

दरम्यान, कंपनीने स्पष्ट केले आहे की त्यांची नवीन ऑफिस-टू-ऑफिस पॉलिसी केवळ जुन्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर फ्रेशर्सनाही लागू असेल. रिटर्न-टू-ऑफिस पॉलिसी नव्या कर्मचाऱ्यांना देखील लागू होईल. म्हणजेच टीसीएसने कार्यालयात येण्यास कर्मचाऱ्यांना बंधनकारक केले आहे.

कोरोना काळात सर्व कंपन्यांप्रमाणे टीसीएसने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम दिले होते. त्यानंतर फार कमी कर्मचारी कार्यालयात येऊन काम करत आहेत. कंपनीने त्यांना अनेकवेळा कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर TCS ने आपले धोरण बदलले असून आता आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच TCS ने आता वर्क फ्रॉम होम पॉलिसी पूर्णपणे बंद केली आहे.

News Title- Tech company TCS has placed a condition before the employees that the salary will increase only if they come to the office
महत्त्वाच्या बातम्या –

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका

Irfan Pathan नं पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा; रितेश देशमुखनं केली खास कमेंट