Amey Khopkar | पुलवामा हल्ल्याचे पडसाद फक्त सीमेवरच नाही तर, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमेच्या अंतर्गतही उमटले होते. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर कोणताच पाकिस्तानी कलाकार भारतात दिसला नाही. मात्र, नुकतीच ही बंदी हटवण्यात आली आहे. यावरून मनसेने (Amey Khopkar) आपली भूमिका जाहीर करत याचा निषेध केला आहे.
पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याने बॉलीवुडमध्ये अनेक सुपरहीट गाणी दिली आहेत. त्याचे भारतात आजही असंख्य चाहते आहेत. मात्र, या हल्ल्यानंतर तो पुन्हा भारतात दिसलाच नाही. आता तब्बल 7 वर्षांनी तो बॉलीवुडमध्ये पुनरागमन करत आहेत. मात्र, त्याचे येणे मनसेला चांगलेच खटकले आहे. यावरून आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट गंभीर इशारा दिला आहे.
मनसेचा गंभीर इशारा
“अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल.”,असा इशारा अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी दिला आहे. त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) याबाबत पोस्ट केली आहे.
अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत.
विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव…— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 5, 2024
पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय. असा इशारा मनसेने दिला आहे.
पाकिस्तानी कलाकार पुन्हा भारतात काम करणार
अमेय खोपकर यांच्या या पोस्टमुळे आता हा मुद्दा चर्चेत आला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी न देण्याबाबत नियम बनवला होता.
हा निर्णय पुढे कोर्टात गेला. नंतर शेजारील देशांतील नागरिकांचा विरोध करणं देशभक्तीचं प्रदर्शन करत नाही असं म्हणत कोर्टाने हा निर्णय रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार भारतात काम करण्यासाठी तयार झाले आहेत.मात्र, या निर्णयाचा (Amey Khopkar) मनसेकडून विरोध करण्यात येत आहे.
News Title- Amey Khopkar serious warning to Pakistani artists
महत्त्वाच्या बातम्या –
ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट
Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…
“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण
Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले
Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका