भाजप आमदार गोळीबार प्रकरणानंतर शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Firing case | भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळ्या (Firing case) झाडल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. एका जागेच्या वादावरून हा सर्व प्रकार घडला. यामुळे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर विरोधी पक्षाकडून मोठा प्रश्न केला गेला.

आता या घटनेनंतर शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला असून यासंदर्भात अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षाकडून हा मुद्दा उचलून घेतल्यानंतर आता हा मोठा निर्णय  घेतला गेला आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार (Firing case) आता पोलिसांना बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाण्यात आतापर्यंत जवळपास 4 हजार जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आले आहे. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, या गोळीबारानंतर पोलिस सर्वांच्या लायसन्सची पडताळणी करणार आहेत.

पोलिसांकडून बंदूक लायसन्सची पडताळणी

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी पोलिस ज्यांना लायसन्स देण्यात आले आहे, त्यांची सर्व पडताळणी करणार आहे. बंदुकीचे लायसन्स कशासाठी हवे, का हवे, याचा तपास केला जाणार आहे. सर्व कारणे तपासूनच आता लायसन्स दिले जाणार आहेत. पोलिसांना जर याची कारणे आवश्यक वाटली नाही, तर संबंधित व्यक्तींचे लायसन्स रद्द केले जाणार आहे. त्यामुळे आता कुणालाही सहजासहजी बंदूक लायसन्स मिळणार नाही. यासाठी सर्व पडताळणी होणार आहे.

भाजप आमदारावर कारवाई

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. महेश गायकवाड जाग्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांच्यामध्ये वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी ते दोघेही पोलिस ठाण्यामध्ये आले, मात्र तिथं वाद निवळण्याऐवजी गणपत गायकवाड यांनी थेट फायरिंग (Firing case) केली.

या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारली गावातील एका जमीन मालकाला गणपत गायकवाड यांनी जेरीस आणलं होतं. त्याला जातीवाचक वक्तव्य केलं होतं. यामुळे शेतकऱ्यानं पोलिस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या गायकवाड यांना 14 तारखपर्यंत अटक करण्यात आली आहे.

News Title- Firearm license verification decision after firing case

महत्त्वाच्या बातम्या –

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका