“ती जखम अजूनही…”, अभिनेत्री भूमी पेडणेकरचा सर्वांत मोठा खुलासा!

Bhumi Pednekar | टॉयलेट-एक प्रेम कथा, बधाई दो, शुभ मंगल सावधान, पती पत्नी और वो तसेच दम लगा के हइशा अशा सुपरहीट चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सतत चर्चेत असते. आता नुकताच तिने केलेल्या एका खुलास्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या ती ‘भक्षक’ या चित्रपटासाठी जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भूमीची एक मुलाखत झाली.  यामध्ये तिने आपल्या सोबत घडलेल्या वाईट अनुभवांबद्दल सर्वांसमोर खुलासा केला.

भूमी पेडणेकरचा धक्कादायक खुलासा

मी 14 वर्षांची असताना ही घटना घडली होती. मला अजूनही लक्षात आहे, तो दिवस. वांद्र्यात तेव्हा एक भव्य जत्रा भरायची. याच जत्रेत मी माझ्या कुटुंबियांसोबत गेली होती. जत्रेत मी चालत होती. तेव्हा अचानकच माझ्या पाठीवर कुणी तरी चिमटे घेत होतं. मला तो स्पर्श जाणवत होता. माझ्यासोबत काय घडते आहे, हे मला कळत होते. मात्र, जेव्हा मी मागे वळून बघितले तेव्हा तिथे कुणी नव्हते. माझ्यासोबत माझ्या जवळचे लोक होते, असा खुलासा भूमीने (Bhumi Pednekar) केला.

पुढे बोलताना भूमी म्हणाली की, “या घटनेचा मला खूप मोठा धक्का बसला होता. तेव्हा माझ्यासोबत नेमकं काय होत होतं ते मला समजलंच नाही. पण मला तो स्पर्श आजही आठवतो. मी याबाबत कुणाशी काहीच बोलली नाही. ही घटना तुम्हाला कायम आघात देत असते. आपण अशा घटना कधीच विसरत नाही. यातून तुम्ही कधीच बाहेर पडत नाही.”, असे भूमीने सांगितले.

भूमीचा ‘भक्षक’ चित्रपट चर्चेत

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) , संजय मिश्रा आणि आदित्य श्रीवास्तव यांचा ‘भक्षक’ हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा शेल्टर होममधील मुलांवर होणाऱ्या गैरकृत्यांवर आधारित आहे. हे एका सत्य घटनेने प्रेरित असल्याचं म्हटलं जात आहे.

हा चित्रपट फक्त 40 दिवसांत चित्रीत करण्यात आला आहे. यात भूमी एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2018 साली समोर आलेल्या बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणाची आठवण करून देणारा आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची चर्चा होत आहे.

News Title- Bhumi Pednekar biggest revelation

महत्त्वाच्या बातम्या –

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका

Irfan Pathan नं पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा; रितेश देशमुखनं केली खास कमेंट