Sushant Singh Rajput | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता बरीच वर्षे झाली आहेत. सुशांतच्या निधनाने सर्व बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. सुशांतच्या (Sushant Singh Rajput) बहिणीने एका व्हिडीओद्वारे मोठा खुलासा केला आहे.
सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh) हीने आता थेट सीबीआयकडे यासाठी मागणी केली आहे. सीबीआयने लवकरात लवकर याची चौकशी करून सत्य बाहेर आणावं, अशी मागणी तिने केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.
सुशांतच्या बहिणीची CBI कडे मागणी
“माझ्या भावाला कुणी मारले, याबाबत आम्हाला जाणून घ्यायचे आहे. जो पर्यंत आम्हाला सत्य कळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणून आम्हाला सत्य शोधून काढायचं आहे. आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आवाज बुलंद करावा लागेल. जो पर्यंत याची माहिती मिळत नाही, तो पर्यंत आम्हाला काहीच क्लोजर मिळणार नाही.”, असे सुशांतच्या (Sushant Singh Rajput) बहिणीने म्हटले आहे.
या प्रकरणी आता सीबीआयने लवकरात लवकर पाऊल उचलून काय झाले, याचा खुलासा करावा, अशी मागणीही श्वेता सिंहने केली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओचीच चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) देखील अडचणीत आली होती. सुशांत याचं नाव ड्रग्ज केससोबत देखील जोडण्यात आलं होतं. याच मुळे रिया आणि तिच्या भावाला तुरुंगात जावे लागले होते. या प्रकरणात पुढे अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली होती. आता पुन्हा एकदा हे प्रकरण वर आलं आहे.
सुशांतच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का
अभिनेता सुशांत सिंहने (Sushant Singh Rajput) एका मालिकेपासून आपल्या फिल्मी करीअरला सुरुवात केली होती. पुढे त्याने एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, काय पो छे, पाणी, पिके, राबता, शुद्ध देसी रोमॅन्स अशा हीट चित्रपटांत काम केले. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांच्या मनावर राज्य केले. अजूनही त्याचे लाखो चाहते आहेत. मात्र, त्याच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता.
News Title- Sushant Singh Rajput case Shocking disclosure
महत्त्वाच्या बातम्या –
Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…
“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण
Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले
Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका
Irfan Pathan नं पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा; रितेश देशमुखनं केली खास कमेंट