“…तर उद्धव ठाकरे गटात जाईल”, शहाजी बापूंचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahajibapu Patil |  ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपीटर रूग्णालयामध्ये शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगोल्याचे आमदार शहाजीबापू (Shahajibapu Patil) यांनी शिबिराला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी शिबिराबाबत माहिती सांगितली. तसेच त्यांनी गणपत गायकवाड प्रकरणावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शहाजीबापू? 

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर गोळ्या झाडल्यानं महेश गायकवाड रूग्णालयामध्ये दाखल आहेत. यावर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करोडो रूपये घेतल्याचा दावा केला. त्यांनी केलेला आरोप हा निराधार असल्याचं सांगोल्याचे आमदार शहाजीबापू (Shahajibapu Patil) यांनी वक्तव्य केलं आहे. ते रविवारी ठाण्यामध्ये बोलत होते.

आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद वैयक्तिक मालमत्तेवरून झाला आहे. यामध्ये पक्षातील वाद नाही, असं शहाजीबापू म्हणाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की वैयक्तिक कारणासाठी कोणीही एकमेकांवर खापर फोडू नये. याप्रकरणाला पक्षीय रंग नको, असं ते म्हणाले आहेत.

“श्रीकांत शिंदे देवदूत”

श्रीकांत शिंदे हे देवदूत आहेत. कोणी काय आरोप करतो त्याची काही गरज नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी आपल्या सांगोल्याला दोन कोटी मदत म्हणून दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक लाख रूपये तरी दिले आहेत का?, असा सवाल उपस्थित केला आहे.

“…तर मी उद्धव ठाकरेंच्या सेनेत जाईल”

“एकनाथ शिंदे यांनी सांगोल्याला दोन कोटींची रूग्णाना मदत दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक लाख रूपये तरी रूग्णालयाला दिले का? दिले असतील तर मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जातो,” असं वक्तव्य एकनाथ शहाजीबापू यांनी केलं.

“कोणताही गाजावाजा न करता…”

“कशाचाही गाजावाजा न करता श्रीकांत शिंदे यांच्या ज्युपीटर रूग्णालयामध्ये 150 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 600 शस्त्रक्रिया करण्यात येणार”, असल्याचं पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी माहिती दिली आहे. “एकनाथ शिंदेंनी दिलेलं काम श्रीकांत शिंदे यांनी केलं”, असल्याचं शभुराज देसाई म्हणाले आहेत.

News Title – Shahajibapu On uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई!

“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“रोहित पवार यांच्या शरीरामध्ये रक्त नाहीतर जातीयवाद वाहतोय”

‘त्या’ घटनेवर हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा संताप, म्हणाली…

Uddhav Thackeray Attack Eknath Shinde l ‘महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरू’… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल