“नाभिक समाजातील मुलांचं शिक्षण, आजारपण भुजबळ काढणार आहेत का?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | मराठा समाज गेल्या काही दिवसांपासून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी सभा घेत मराठा आरक्षणाचा लढा उभारला, त्यानंतर मराठा समाजाला राज्यसरकारने ओबीसी प्रवर्गामध्ये समावून घेण्याबाबत अधिसूचना काढल्या आहेत. याविरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अहमदनगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये दोन्ही समाजामध्ये वाद होईल असं वक्तव्य केलं आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) चांगलाच समाचार घेतला.

अहमदनगरमध्ये छगन भुजबळ यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांचे कान टोचले आहेत. भुजबळ हे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

काय म्हणाले छगन भुजबळ?

अहमदनगरमध्ये छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजात वाद निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. नाभिक समाजातील बांधवांनी मराठा समाजावर बहिष्कार टाकावा. एकाही मराठा समाजाची हजामत करायची नाही. मग त्यांना म्हणावं भादरा त्यांनी त्यांची आपापसात, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. यावर आता जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? (Jitendra Awhad)

छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. छगन भुजबळ हे वादग्रस्त विधान करत आहेत. ते जे करत आहेत ते अतिशय वाईट आहे. यामध्ये यावर बहिष्कार घाला, त्यावर बहिष्कार घाला… मी तेच म्हटलं होतं. आपण ज्यावर अवलंबून आहोत. उद्या नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकल्यावर त्याचा धंदा कितीने घटेल? असा सवाल त्यांनी केला आहे.

“मुलाबाळांचं शिक्षण भुजबळ करणार आहेत का?” 

मराठ्यांवर बहिष्कार टाकावा असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकल्यानंतर नाभिक समाजाचा धंदा किती घटेल? भुजबळ पैसे पाठवणार आहेत? मुलाबाळांचा खर्च भुजबळ करणार आहेत? आईचं, बापाचं त्यांच्या मुलाचं आजारपण भुजबळ काढणार आहेत का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

भुजबळांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले आव्हाड?

छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर आव्हाड यांनी वक्तव्य केलं आहे. “राजीनामा द्यायाचा असेल तर तो राज्यपालांकडे करा. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला राजीनामा मुख्यमंत्री नाकारू शकतात. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मुर्ख बनवू नये”.

 

News Titles – Jitendra Awhad On Chhagan bhujbal

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई!

“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“रोहित पवार यांच्या शरीरामध्ये रक्त नाहीतर जातीयवाद वाहतोय”

‘त्या’ घटनेवर हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा संताप, म्हणाली…

Uddhav Thackeray Attack Eknath Shinde l ‘महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरू’… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल