श्रीदेवीच्या मृत्यूचं मोदी कनेक्शन?, 6 वर्षांनंतर मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sridevi | बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचं फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झालं. त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला. त्यांच्या मृत्यूमागे अनेक कारणे सांगितली जात होती. या प्रकरणात आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या 6 वर्षांनंतर एक मोठा खुलासा समोर आला आहे.

श्रीदेव यांच्या निधनानंतर भारत आणि युएई सरकारकडून पुराव्यांची लपवाछपवी केल्याचा धक्कादायक आरोप एका युट्यूबरने केला होता. याच प्रकरणी आता मोठा खुलासा समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नावाने बनावट पत्रे

स्वयंघोषित गुप्तहेर युट्यूबर दिप्ती आर. पिन्निटी हीने अनेक दावे केले होते. आता तिच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर नेत्यांची बनावट पत्रे तयार केली होती. हीच बनावट पत्रे पुरावा म्हणून सादर करत तिने काही दावे केले होते.

सीबीआयने हे सर्व पुरावे खोटे असल्याचे म्हटले आहे. मुंबईमधील चांदनी शाह या वकिलाने दिप्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर सीबीआयने तिच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. दिप्तीने तिच्या व्हिडीओमध्ये श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल (Sridevi) युएई सरकारचे जे रेकॉर्ड्स दाखवले, ते सर्व बनावट असल्याचा खुलासा झाला आहे.

सीबीआयने मागच्या वर्षी दिप्तीच्या घरावर छापा टाकला होता. तेव्हा सीबीआयने तिचे फोन्स आणि लॅपटॉप जप्त केले होते. या प्रकरणी आता सीबीआयने विशेष कोर्टात रिपोर्ट सादर केला आहे. तसेच, दिप्तीने सर्व बनावट कागदपत्रे सादर केल्याचे म्हटले आहे. मात्र यावर दिप्तीने उलट सीबीआयवरच आरोप केले आहेत. सीबीआयने माझा जबाब नोंदवलाच नसल्याचं तिने म्हटलं आहे.

कोण आहे दिप्ती आर. पिन्निटी?

दिप्ती आर.पिन्निटी (Deepti R. pinnity) ही स्वयंघोषित गुप्तहेर आहे. तिने युट्यूबर अनेक व्हिडिओ बनवले आहेत. सुशांत सिंह राजपूत, श्रीदेवी (Sridevi), दिशा सालियन तसेच इतर बॉलीवुड कलाकारांच्या रहस्यमयी मृत्यूंबाबत तपास करणारी बिझनेसवुमन असा तिने स्वतःचा उल्लेख केला आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूची बनावट कागदपत्रे सादर करून तिने अनेक गंभीर आरोप केले होती. मात्र, आता सीबीआयने हे सर्व आरोप बनावट असल्याचे म्हटले आहे.

News Title-  Big revelation in Sridevi death case

महत्त्वाच्या बातम्या –

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका