Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर आरोप करत आहेत. मात्र सध्याचं राज्याचं राजकारण पाहता पुतण्यानं आपल्या काकाच्या मरणाबाबत वक्तव्य केलं असल्याचं शरद पवार गटातील नेत्यांनी आरोप केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत लोकसभेच्या निवडणुकीसाठी गेले त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी बारामतीला जात आपला उमेदवार निवडून देण्याबाबत मतदारांनी आवाहन केलं आहे. अनेक लोकं म्हणतील शेवटची निवडणूक, पण त्यांच्या भावनेशी बळी पडू नका. कधी शेवटची निवडणूक होईल काय माहित, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. यावर शरद पवार गटासह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकेची तोफ डागली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
ज्या शरद पवारांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं, मोठं केलं प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्याबाबतीत असं बोलत आहात. त्यांच्या कळपात गेल्यापासून आपण लांडग्यांची भूमिका घेतली आहे. मी तुम्हाला वाघ म्हणणार नाही, कारण वाघाला काळीज असतं. तुमचे शरद पवारांबाबत राजकीय मतभेद असतील मात्र तुम्ही जे चार घास खात आहात ते पवारांमुळे, असं राऊत म्हणाले आहेत.
अजित पवार तुम्ही कोण आहात? पवारांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं ते नसतं केलं तर आपण कुठे असता? अजित पवार आपण बारामतीत सायकलवर फिरत होतात आम्ही पाहिलं आहे. आज तुम्ही जे आहात ते केवळ शरद पवारांमुळेच. माणसाने एवढंही कृतघ्न असू नये, असं राऊत म्हणाले.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत राज्यभरातून टीका होताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या काकाच्या मरणाची वाट पाहता का?, असा सवाल करत हल्ला चढवला आहे. तसेच त्यानंतर राऊत यांनी देखील त्यांची चांगलीच फिरकी घेतली.
शिंदे गटाच्या नेत्याबद्दल ‘तो’ व्हिडीओ
“शिंदे गटाचे खासदार हे परदेशामध्ये का जातात? याबाबत लवकरच गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार परदेशामध्ये कशासाठी जातात हे सांगणार तो व्हिडीओ लवकरच बाहेर काढण्यात येणार आहे, वेट अँड वॉच”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
News Title – Sanjay Raut On Ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या
ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट
Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…
“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण
Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले
Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका