ग्रॅमी पुरस्कारात भारताचा डंका; ‘या’ संगीतकारांनी उंचावली भारतीयांची मान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Grammy Awards 2024 | भारतीय संगीत जगापार पोहोचले आहे. भारतीय संगीताला एक इतिहास आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्रातही भारतीय संगीताने आपली छाप सोडली आहे. अत्यंत प्रतिष्ठित अशा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीयांनी आपलं नाव कोरलं आहे. तबलावादक झाकीर हुसैन यांच्यासह गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या ‘शक्ती’ या फ्युजन बँडने या सोहळ्यात (Grammy Awards 2024) बाजी मारली आहे.

सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बममध्ये त्यांनी बाजी मारत पुरस्कार पटकावला आहे. ग्लोबल म्युझिक अल्बम आणि ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या दोन्ही विभागात भारतीय कलाकारांनी बाजी मारली आहे. यामुळे भारतीयांची नक्कीच मान उंचावली आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

‘शक्ती’ या फ्युजन बँडला मिळाला ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards 2024) हा रविवारी रात्री 8.30 सुरू झाला. इथे भारतीय वेळेनुसार आज (5 जानेवारी) सकाळी 6.30 वाजेपासून याची सुरुवात झाली. या सोहळ्यात चार भारतीयांनी पुरस्कार पटकावला. ‘शक्ती’ बँडच्या ‘दिस मोमेंट’ला ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. जॉन मॅकलॉघलिन, झाकिर हुसैन, शंकर महादेवन, वी. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांनी एकत्र मिळून याची निर्मिती केली होती. या बँडने 45 वर्षांनी आपला पहिला एल्बम प्रदर्शित केला आहे.

शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्यासह देशातील चार संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. त्यामुळे सर्व भारतीयांकडून त्यांचे कौतुक तर होतंच आहे शिवाय शुभेच्छांचा वर्षावही केला जात आहे. उस्ताद झाकीर हुसैन यांनी बासुरीवादक राकेश चौरसिया यांच्यासोबत मिळून दुसरा ग्रॅमी पुरस्कार मिळवला आहे.

इंग्लिश गिटार वादक जॉन मॅक्लॉफलिन यांनी 1973 मध्ये भारतीय व्हायोलिन वादक एल.शंकर, तबला वादक झाकीर हुसैन आणि टी.एच. ‘विक्कू’ विनायकराम यांच्यासोबत ‘शक्ती’या फ्युजन बँडची निर्मिती केली. मात्र 1977 नंतर हा बँड फारसा सक्रिय राहीला नाही. यानंतर साधारण 45 वर्षांनी पुन्हा एकदा या बँडने नवीन निर्मिती केली. याला थेट
ग्रॅमी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

तबलावादक झाकीर हुसैन यांना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार

भारतातील प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards 2024) मिळाला. याआधी त्यांनी ‘प्लॅनेट ड्रम्स’या अल्बमसाठी टी.एच. ‘विक्कू’ विनायकराम यांच्यासोबत ग्रॅमी पुरस्कार पटकावला होता. तर, 2008 मध्ये त्यांना ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’साठीदेखील ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. आता ‘शक्ती’ या फ्युजन बँडला असा त्यांना तिसरा पुरस्कार मिळाला आहे.

News Title-  Grammy Awards 2024 fusion band shakti as best global music album

महत्त्वाच्या बातम्या –

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका