Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याच्या अभिषेकला शुभेच्छा; दुर्मिळ फोटो केला शेअर, चाहत्यांनी चर्चेला दिला पूर्णविराम!

Aishwarya Rai | बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने 5 फेब्रुवारीला त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी चाहत्यांपासून ते मोठ्या स्टार्सपर्यंत सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याची पत्नी ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर शुभेच्छा न दिल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, रात्री ऐश्वर्याने काही खास फोटो शेअर करत अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या पतीला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करताना ऐश्वर्याने चारोळ्या लिहून अभिषेकचा खास दिवस संस्मरणीय बनवला. अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायने त्याला सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक न पाहिलेला फोटो देखील आहे, जो खूप जुना आहे.

दुर्मिळ फोटो केला शेअर

ऐश्वर्याने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ऐश्वर्यासोबत अभिषेक आणि मुलगी आराध्याही दिसत आहेत. तिने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले, “तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप आनंद, प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो. खूप सारे प्रेम.” या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. खरं तर मागील काही कालावधीपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ऐश्वर्याच्या या पोस्टमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटले.

Aishwarya Rai च्या अभिषेकला खास शुभेच्छा

ऐश्वर्याने शेअर केलेला दुसरा फोटो अभिषेक बच्चनच्या बालपणीचा आहे. फोटोमध्ये तो हसताना आणि खूपच क्यूट दिसत आहे. त्याची बालपणीची शैली चाहत्यांना भुरळ घालत आहे. ऐश्वर्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहतेही अभिषेकला शुभेच्छा देत आहेत.

 

अभिषेक बच्चनच्या कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने 2000 साली प्रदर्शित झालेल्या रेफ्युजी या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर दिसली होती. पण हा चित्रपट लोकांना तितकासा आकर्षित करू शकला नाही आणि कमाईच्या बाबतीतही मागे राहिला.

त्यानंतर अभिषेकचे जवळपास 12 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आणि मग 2004 मध्ये त्याचा एक चित्रपट आला, ज्यामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तो चित्रपट म्हणजे धूम. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. अभिषेक मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या घूमर या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

News Title- Actress Aishwarya Rai Bachchan has wished husband Abhishek Bachchan on his birthday by sharing a rare photo
महत्त्वाच्या बातम्या –

Job Alert | सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी संधी, तब्बल 12 हजार जागा निघाल्या

ऐश्वर्या-अभिषेकचं नक्कीच बिनसलंय; ऐश्वर्याने केलं असं काही की…

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

वाढदिवसाच्या दिवशीच श्रीकांत शिंदे सापडले मोठ्या अडचणीत!