Job Alert | सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी संधी, तब्बल 12 हजार जागा निघाल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Alert | सरकारी नोकरी मिळवण्यासाठी झटत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) अर्थात आयकर विभागात बंपर भरती निघाली आहे. (Income Tax Department Recruitment 2024) केंद्रीय आयकर विभागाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, आयकर विभागात 10,000 ते 12,000 कर्मचाऱ्यांची कमतरता असून रिक्त पदे भरण्यासाठी पावले उचलली जात आहेत. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर करदात्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

आयकर विभागाचे अध्यक्ष म्हणाले की, अंतरिम अर्थसंकल्पात 25,000 रुपयांपर्यंतची थकबाकी कराची मागणी मागे घेण्याच्या घोषणेनुसार, करदात्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचा दिलासा मिळू शकतो. याचा फायदा अशा करदात्यांना होईल ज्यांना विहित कालावधीत एक वर्षापेक्षा जास्त कर मागणीबाबत नोटिसा मिळाल्या आहेत.

आयकर विभागात आताच्या घडीला 10,000 ते 12,000 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ही पदे प्रामुख्याने गट ‘क’ श्रेणीतील आहेत. आयकर विभागात रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पावले उचलली जात आहेत. विभागातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 55,000 आहे, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.

अंतरिम अर्थसंकल्पात 25,000 रुपयांपर्यंतची कर मागणी मागे घेण्याबाबत विचारले असता गुप्ता म्हणाले, “या उपक्रमाचा उद्देश करदात्यांना दिलासा देणे आहे. या अंतर्गत आम्ही 1 लाख रुपयांपर्यंत मर्यादा ठेवण्याचा प्रयत्न करू. करदात्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ कराच्या मागणीबाबत नोटीस मिळाली असेल तर त्याला 1 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते.”

Job Alert 12 हजार जागा निघाल्या

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात 2009-10 पर्यंत 25,000 रुपयांपर्यंत आणि आर्थिक वर्ष 2010-11 ते 2014-15 पर्यंत 10,000 रुपयांपर्यंतच्या थेट कर मागण्या मागे घेण्याची घोषणा केली, असेही गुप्ता यांनी सांगितले.

लवकरच आयकर विभागात रिक्त असलेली 10 ते 12 हजार पदे भरली जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. विभागाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, आयकर विभागात 10,000 ते 12,000 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.

News Title- Income Tax Department Recruitment 2024 will be recruiting for 10 to 12 thousand seats
महत्त्वाच्या बातम्या –

ऐश्वर्या-अभिषेकचं नक्कीच बिनसलंय; ऐश्वर्याने केलं असं काही की…

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

वाढदिवसाच्या दिवशीच श्रीकांत शिंदे सापडले मोठ्या अडचणीत!

कैद्यांवर राहणार करडी नजर; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय