कैद्यांवर राहणार करडी नजर; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CCTV FACILITIES JAIL | राज्यामध्ये सध्या अनेक गुन्हे होताना दिसत आहेत. अनेक हत्या देखील होताना दिसत आहेत. यावर पोलीस नियंत्रणा लक्ष ठेवताना दिसते. मात्र कारागृहात नेमकं काय चालु आहे? अनेकदा कारागृहातून काही आरोपी पळून गेले आहेत, असे अनेक धक्कादायक प्रकार तुरुंगामध्ये घडलेला पाहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यातील कारागृहांमध्ये सीसीटीव्ही (CCTV FACILITIES JAIL) लावण्याचा निर्णय घेतला आहे.

कारागृहांमध्ये नेमकं काय सुरू असतं यावर नजर ठेवणं अवघड आहे. मात्र आता ते सीसीटीव्हीनं सोपं होणार आहे. आता गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा कारागृहात मारामारी होते आणि यातून अनेकदा कारागृहामध्ये खून होतात, अशावेळी यातील काही घटना जाणून घेणं शक्य होत नसल्यानं कारागृहांमध्ये सीसीटीव्हीची (CCTV FACILITIES JAIL) करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

कारागृहात होतात बेकायदेशीर घटना

अनेकदा कारागृहात बेकायदेशीर घटना घडताना दिसत आहेत. यामुळे कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. अनेकदा कारागृहात घडलेल्या घटनांचा योग्य तपास लावता येत नाही. तसेच कैद्यांकडून होत असलेल्या छुप्या कारणांबाबत प्रशासनासमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात, यासाठी सीसीटीव्हीनं कौद्यांवर वॉच ठेवता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कौद्यांमध्ये अनेकदा मारामारी झाली आहे. यातून खून देखील केला जातो, अशा कृत्यावर करडी नजर राहावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये देशातील आणि  राज्यातील सर्व कारागृहामध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. त्या निर्णयानुसार अंमबजावणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती कारागृहामध्ये 812 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. राज्यातील अन्य कारागृहामध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. सर्वाधिक कॅमेरे हे येरवडा येथे बसवण्यात आले असून त्या खालोखाल नागपूर कारागृहामध्ये बसवण्यात आले आहेत.

भविष्यात कंट्रोलरूमशी सीसीटीव्ही (CCTV FACILITIES JAIL) जोडण्यात येणार

उर्वरित 44 कारागृहांमध्ये पुढील वित्तीय वर्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. भविष्यामध्ये कारागृहातील सीसीटीव्ही हे कंट्रोलरूमशी जोडण्यात येणार आहेत.

News Title – CCTV FACILITIES JAIL ANNOUNCE SUPREME COURT

महत्त्वाच्या बतम्या

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका