Cricket News | वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूला बंदुकीचा धाक दाखवून लुटले; फोन आणि बॅग हिसकावून चोरटे पसार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Cricket News | दक्षिण आफ्रिकेत सध्या आयपीएलच्या धर्तीवर खेळवल्या जात असलेल्या साऊथ आफ्रिका ट्वेंटी-20 (SA20) लीगचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत भारत वगळता देशभरातील विविध देशातील खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या फ्रँचायझींनी इथे संघ खरेदी केले आहेत. मात्र, ही स्पर्धा आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कारण एका चोरीच्या घटनेमुळे SA20 लीगला नकारात्मक प्रसिद्धी मिळत आहे.

या स्पर्धेत पार्ल रॉयल्सकडून खेळत असलेल्या वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन ॲलन याला बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले. जोहान्सबर्गमधील संघाच्या हॉटेलबाहेर 28 वर्षीय ॲलनसोबत ही घटना घडली. हल्लेखोरांनी ॲलनला बंदुकीचा धाक दाखवला आणि त्याचा फोन तसेच त्याच्या बॅगसह वैयक्तिक वस्तू काढून घेतल्या.

Fabian Allen ला लुटले

या घटनेमुळे SA20 मध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंची चिंता वाढली आहे. ‘क्रिकबझ’ने दिलेल्या माहितीनुसार, कॅरेबियन खेळाडू ॲलनला प्रसिद्ध सँडटन हॉटेलच्या बाहेर लक्ष्य करण्यात आले. हल्लेखोर बंदूकधारी होते असे सांगण्यात येत आहे. या घटनेला पार्ल रॉयल्स संघ आणि क्रिकेट वेस्ट इंडीजने दुजोरा दिला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने कबूल केले की ॲलनला लुटण्यात आले, परंतु सुदैवाने अष्टपैलू खेळाडूला कोणतीही हानी पोहचली नाही. ॲलन आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या संघांचा भाग राहिला आहे. मागील वर्षापासून SA20 लीग खेळवली जात आहे. यंदा या स्पर्धेचा दुसरा हंगाम आहे. 10 जानेवारीला सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ॲलनच्या आधी अशी घटना आणखी एका खेळाडूसोबत घडली होती

Cricket News खेळाडूंची सुरक्षा ऐरणीवर

अलीकडच्या काही दिवसांत SA20 मध्ये खेळाडूंच्या सुरक्षेत चूक होण्याची ही दुसरी घटना आहे. या स्पर्धेचे साखळी सामने संपले आहेत. आता प्लेऑफचे सामने होणार आहेत. 7 फेब्रुवारीला एलिमिनेटरमध्ये ॲलनची टीम पार्ल रॉयल्सचा सामना जॉबर्ग सुपर किंग्जशी होईल. तर स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारीला होणार आहे.

फॅबियन ॲलनचे वन डे आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीयमधील पदार्पण 2018 मध्ये भारताविरुद्ध झाले होते. आतापर्यंत खेळलेल्या 20 वन डे सामन्यांमध्ये त्याने 7 बळी घेतले असून 200 धावा केल्या आहेत. ॲलनने ट्वेंटी-20 मध्ये एकूण 34 सामने खेळले असून 24 बळी घेण्यात त्याला यश आले. याशिवाय त्याच्या बॅटमधून 267 धावा निघाल्या आहेत. ॲलन फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिजच्या जर्सीत शेवटचा दिसला होता.

News Title- West Indies player Fabian Allen robbed at gunpoint, phone and bag taken by thugs during SA20 league in South Africa
महत्त्वाच्या बातम्या –

Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याच्या अभिषेकला शुभेच्छा; दुर्मिळ फोटो केला शेअर, चाहत्यांनी चर्चेला दिला पूर्णविराम!

Job Alert | सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी संधी, तब्बल 12 हजार जागा निघाल्या

ऐश्वर्या-अभिषेकचं नक्कीच बिनसलंय; ऐश्वर्याने केलं असं काही की…

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!