रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?, मोठा खुलासा आला समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल (IPL 2024) आता काही दिवसांमध्येच सुरू होणार आहे. काही दिवसांआधी आयपीएलचा लिलाव झाला आणि करोडो रूपयांची उधळण देखील करण्यात आली आहे. अशातच यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदावर हार्दिक पांड्याला दावेदार मानलं आहे. यावरून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सने सोशल मीडियावर बहिष्कार टाकला असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. याचं कारण आता समोर आलं आहे.

हार्दिक पांड्याला मुंबई इंडिन्स या संघामध्ये ड्रेड विंडोच्या माध्यमातून घेतलं आहे. त्यानंतर रोहित शर्माचं कर्णधारपद काढून पांड्याला कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली आहे. असं का झालं असावं? असा अनेकांना सवाल पडला आहे. यावर आता मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाले मार्क बाउचर?

“हार्दिक पांड्याला संघात घेणं हा क्रिकेटमधील अंतर्गत विषय आहे. हा एक ट्रांजिशन फेज आहे. याबाबत भारतीयांना माहिती नाही. लोकं खूपच भावनिक होतात पण भावना दूर ठेवल्या पाहिजेत. रोहित शर्मा खेळाडू म्हणून ग्रेट आहेच आणि त्याला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊद्या. चांगल्या धावा करू द्या”, असं मार्क बाउचर म्हणाले आहेत.

रोहित शर्मा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. मुंबई इंडियन्स संघाचं अनेक वर्षांपासून तो कर्णधारपद भूषवत आहे. सध्या टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. तो सध्या सर्वात व्यस्त आहे. काही पर्वामध्ये त्याची फारशी चांगली फलंदाजी झाली नाही पण तो सध्या चांगली फलंदाजी करत आहे असंही मार्क बाउचर म्हणाले

“तो सध्या टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्यानं घेतली आहे. त्याच पद्धतीनं तो जबाबदारनं खेळ दाखवेल. मला त्याला मुंबई इंडियन्समध्ये खेळताना पाहायचं आहे,” असं मार्क बाउचर म्हणाले आहेत.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार

हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून डावलण्यात आलं आहे. हा संघमालकांचा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून रोहित शर्माच्या अनेक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम हँडलला अनफॉलो केलं होतं. त्याच इंस्टाग्राम हँडलचं अनेक फेक फॉलोवर्स वाढवण्याबाबत बातम्या येत होत्या.

News Title – IPL 2024 Hardik Pandya mumbai Indians captain

महत्वाच्या बातम्या

ऐश्वर्या-अभिषेकचं नक्कीच बिनसलंय; ऐश्वर्याने केलं असं काही की…

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

वाढदिवसाच्या दिवशीच श्रीकांत शिंदे सापडले मोठ्या अडचणीत!

कैद्यांवर राहणार करडी नजर; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय