घटस्फोटानंतर किरण सोबतच्या नात्याबाबत आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला..

Aamir Khan | अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेऊन आता बरीच वर्ष झाली आहेत. मात्र त्यांच्यात अजूनही प्रेमळ नाते संबंध दिसून येतात. नुकताच आमिर (Aamir Khan) आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान हीचा नूपुर शिखरे सोबत विवाह झाला. या विवाह सोहळ्यात किरण प्रत्येक कार्यक्रमात हजर होती.

किरणने आयरासाठी एका आईची भूमिका उत्तम बजावली. या लग्नातच आमिर आणि किरणचा चांगला बॉन्डही दिसून आला. अगदी लग्नात नाचण्यापासून ते लेकीसाठी तिने संगित सेरेमनीमध्ये गाणेही गायले. आता आमिरने आपल्या आणि किरणच्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे. घटस्फोटानंतरही अनेक प्रोजेक्ट्सनिमित्त आणि कौटुंबिक कार्यक्रमांनिमित्त ते एकत्र येत असतात. त्यांच्यात सध्या कसे संबंध आहेत, यावर आमिरने मनमोकळे सांगितले आहे.

काय म्हणाला आमिर खान?

“किरण माझ्या आयुष्यात आली हे माझं सुदैव आहे. आमचा प्रवास माझ्यासाठी परिपूर्ण आहे. आम्ही मिळून अनेक गोष्टी घडवल्या आहेत. आम्ही माणूसकी आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहोत आणि यापुढेही राहू. आम्ही आताही एका फॅमिलीसारखे आहोत”, असे आमिर खान (Aamir Khan) म्हणाला आहे.

किरणचे मन अत्यंत निर्मळ आणि सुंदर आहे. ती मला कधीकधी कामादरम्यान ओरडत असते. मी तिचं ओरडणंही एंजॉय करतो. आम्हाला दोघांनाही एकत्र काम करण्यात मज्जा येते. तसेच घटस्फोट झाल्यानंतर तुम्ही लगेच एकमेकांचे शत्रू होता, असे कुठल्याही डॉक्टरांनी सांगितले नसल्याचेही आमिर म्हणाला.

“..तर मी ती भूमिका नक्कीच करेल”

या मुलाखतीमध्ये आमिरने आपल्या अभिनयाबद्दलही खुलासा केला. एखाद्या चित्रपटाची कथा रोमँटिक असेल तर असा चित्रपट करायला मला नक्कीच आवडेल. या वयात रोमान्स करणं थोडं अनकॉमन असतं. मात्र, ती भूमिका माझ्यासाठी योग्य वाटत असेल तर मी नक्कीच त्यासाठी काम करेल, असे आमिर (Aamir Khan) म्हणाला.

तसेच, माझ्या वयानुसार मला साजेशा भूमिका करायला आवडेल. मला आता सध्या जर एका तरुण मुलाची भूमिका दिली जो फक्त 18 वर्षांचा असेल तर मला ते करायला अवघड जाईल, किंवा मी ते नाही करू शकणार, असेही आमिर म्हणाला.

News Title- Aamir Khan big revelation about Kiran Rao

महत्त्वाच्या बातम्या –

“आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे पण…”, Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा

Narendra Modi | महागाईवरून काँग्रेसवर घणाघात; मोदींच्या लोकसभेतील भाषणातील 10 प्रमुख मुद्दे, वाचा

Ram Mandir आंदोलनाचे श्रेय मी घेऊ नये म्हणून मला राजकारणातून संपवलं; माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा

Cricket News | वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूला बंदुकीचा धाक दाखवून लुटले; फोन आणि बॅग हिसकावून चोरटे पसार

Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याच्या अभिषेकला शुभेच्छा; दुर्मिळ फोटो केला शेअर, चाहत्यांनी चर्चेला दिला पूर्णविराम!