“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”, Poonam Pandey ची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey | मॉडेल, अभिनेत्री पुनम पांडेच्या मॅनेजरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर 2 फेब्रुवारी रोजी पुनमच्या निधनाची पोस्ट टाकली होती. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुनमने (Poonam Pandey) आपण जिवंत असून गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी हे नाटक केले असल्याची कबुली दिली. मात्र, या नाटकाचा तिला चांगलाच फटका बसला आहे.

पुनम पांडेच्या या कृत्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. तर, तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा पुनमने सोशल मिडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे. तिने अजून एक पोस्ट लिहीत आपले स्पष्टीकरण दिले आहे.

“‘मला मारून टाका, मला फासावर लटकवा पण..”

पुनमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ‘मला मारून टाका, मला फासावर लटकवा पण तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवा.’, अशा आशयाची पोस्ट तिने (Poonam Pandey) केली आहे. एका मार्केटिंग एजन्सीसोबत मिळून पूनम पांडेने याची मोहीम राबवली आहे. मात्र, लोकांना त्याचा जाम संताप झाला आहे. त्यामुळे पुनमवर प्रचंड टीका केली जात आहे.

‘आमचं एकमात्र लक्ष्य होतं, ते म्हणजे सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरुकता वाढवणं. 2022 मध्ये भारतात 1,23,907 सर्वाइकल कॅन्सरचे केस आणि 77,348 मृत्यूंची नोंद झाली. ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्वाइकल कॅन्सर हा भारतातील मध्यम वयाच्या वर्गातील महिलांना प्रभावित करणारा दुसरा सर्वाधिक घातक आजार आहे. तुमच्यापैकी अनेकांना याविषयी माहिती नसेल. मात्र पूनमच्या आईने कॅन्सरशी झुंज दिली आहे’, अशी पोस्ट पुनमच्या मार्केटिंग एजन्सीकडून करण्यात आली होती. वाद वाढत असल्याचे दिसताच त्यांनी माफी मागितली.

‘सर्वाइकल कॅन्सर’ ट्रेंडिंगमध्ये आल्याचा दावा

पुनमने (Poonam Pandey) ज्या मार्केटिंग एजन्सीसोबत मिळून ही मोहीम राबवली त्यांनी एक दावाही केला आहे. देशात प्रथमच सर्वाइकल कॅन्सर हा शब्द 1000 पेक्षा अधिक ट्रेंडिंगमध्ये आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या खोट्या बातमीमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या, यासाठी आम्ही माफी मागतो, असेही या एजन्सीने म्हटले होते.

“मी प्रसिद्धीसाठी हे केले नाही कारण मला प्रसिद्धीची गरज नाही. मला माहित होते की लोकांच्या अशा प्रतिक्रियांना सामोरे जावे लागेल पण हे एका चांगल्या कारणासाठी केले. माझ्या मृत्यूची माहिती मिळताच सर्वांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल जाणून घ्यायचे होते आणि अनेकांनी याच्या तळाशी जाऊन माहितीही घेतली.”,असा खुलासा नंतर पुनमने केला होता.

News Title-  Poonam Pandey controversial post

महत्त्वाच्या बातम्या –

“आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे पण…”, Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा

Narendra Modi | महागाईवरून काँग्रेसवर घणाघात; मोदींच्या लोकसभेतील भाषणातील 10 प्रमुख मुद्दे, वाचा

Ram Mandir आंदोलनाचे श्रेय मी घेऊ नये म्हणून मला राजकारणातून संपवलं; माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा

Cricket News | वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूला बंदुकीचा धाक दाखवून लुटले; फोन आणि बॅग हिसकावून चोरटे पसार

Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याच्या अभिषेकला शुभेच्छा; दुर्मिळ फोटो केला शेअर, चाहत्यांनी चर्चेला दिला पूर्णविराम!