“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी…”, अमृता फडणवीसांची उखाण्यातून टोलेबाजी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amruta Fadnavis | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच चर्चेत असतात. गायनाने त्यांनी सर्वांच्या मनावर राज्य केलेच आहे, पण त्या सतत पती देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही करत असतात. अनेकदा अमृता यांनी मनातल्या गोष्टी सर्वांसमोर बोलून दाखवल्या आहेत. आता नुकताच त्यांनी घेतलेला एक उखाणा चर्चेत आला आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या उखाण्यातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात अमृता फडणवीस बोलत होत्या.

अमृता फडणवीसांची टोलेबाजी

हळदी कुंकू कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना महिलांनी उखाणा घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो लगेच मान्यही केला. “देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण”, असा उखाणा अमृता फडणवीस यांनी यावेळी घेतला.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सतत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या पूर्वीच्या सरकारला भाजप सतत नाकर्ते म्हणून डिवचत असते. आता अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही विरोधकांवर निशाणा साधत टोलबाजी केली.

अमृता फडणवीस यांच्या या उखाण्याची आता जोरदार चर्चा होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. फडणवीस विरोधकांवर निशाणा साधत असतातच पण, त्यांच्या पत्नी अमृता या देखील बोलण्याची संधी सोडत नाहीत.

अमृता फडणवीस यांनी गायले गाणे

या कार्यक्रमात अमृता (Amruta Fadnavis) यांनी महिलांच्या आग्रहामुळे गाणेही गायले. त्यांनी अनेक एल्बम प्रदर्शित केली आहेत. यासोबतच त्यांची भक्ती गीतेही प्रसिद्ध झाली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख नाही. तर एक अभिनेत्री, गायिका आणि बँकर म्हणूनही त्या प्रचलित आहेत. अमृता यांनी नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथून पदवी घेतली आहे. त्या ॲक्सिस बँकेत बरीच वर्षे कार्यरत होत्या.

News Title-  Amruta Fadnavis targets opponents

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?, मोठा खुलासा आला समोर

IND vs ENG: गांगुलीच्या वक्तव्यामुळे गदारोळ; द्रविडची तिखट प्रतिक्रिया, भारताचा विजय पण…

“आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे पण…”, Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा

Narendra Modi | महागाईवरून काँग्रेसवर घणाघात; मोदींच्या लोकसभेतील भाषणातील 10 प्रमुख मुद्दे, वाचा

Ram Mandir आंदोलनाचे श्रेय मी घेऊ नये म्हणून मला राजकारणातून संपवलं; माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा