IND vs ENG | टीम इंडियाने चौथ्या दिवशीच इंग्लंडविरुद्धची (IND vs ENG) दुसरी कसोटी जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीने द्विशतक तर गिलने शतक झळकावलं. यॉर्कर किंग बुमराहने दोन्ही डावात शानदार गोलंदाजी केली. या वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 अशा एकूण 9 विकेट घेतल्या. मात्र विजयानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळला नाही. मात्र राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याचं पुनरागमन होईल असं बोललं जात आहे. एकीकडे सिराज मैदानात परतणार आहे, तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह तिसऱ्या सामन्यातून बाहेर राहू शकतो. बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु क्रिकबझच्या अहवालावर विश्वास ठेवला तर बुमराहने सलग 2 सामने खेळले आहेत. आणि अजून 3 सामने बाकी आहेत.
सतत इतकं खेळल्यामुळे वेगवान गोलंदाजाच्या फिटनेसवर परिणाम होईल, अशी भीती आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाचा धोका नसल्याने यॉर्कर किंगला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, बुमराहला विश्रांती मिळाल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
तिसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराज परतला तर बुमराहच्या अनुपस्थितीत सिराज पुढच्या कसोटीत टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज राहू शकतो, अशी दाट शक्यता आहे. कारण मोहम्मद शमी या मालिकेतून पूर्णपणे बाहेर आहे.
IND vs ENG | भारताचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान, आवेश खान, सौरभ कुमार. आणि ध्रुव जुरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी…”, अमृता फडणवीसांची उखाण्यातून टोलेबाजी
“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”, Poonam Pandey ची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट
घटस्फोटानंतर किरण सोबतच्या नात्याबाबत आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला..
रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?, मोठा खुलासा आला समोर
IND vs ENG: गांगुलीच्या वक्तव्यामुळे गदारोळ; द्रविडची तिखट प्रतिक्रिया, भारताचा विजय पण